Weather Update 27 June: मुंबईसह उपनगरांना अतिवृष्टीचा इशारा; पुढचे २ दिवस महत्वाचे, ऑरेंज अलर्ट जारी

Heavy Rain In Mumbai: त्यामुळे मुंबईकरांची आणखीन दाणादाण होण्याची शक्यता आहे.
Weather Update 27 June
Weather Update 27 JuneSaam TV
Published On

Maharashtra Weather Update 27 June: राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मुंबईला झोडपलंय. मुंबईसह उपनगरांमध्ये पुढचे दोन दिवस पाऊस असाच कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Department) वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांची आणखीन दाणादाण होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

२ दिवस ऑरेंज अलर्ट

नैऋत्य मोसमी वारे संपूर्ण मुंबईभर पसरले आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस मुंबईसाठी महत्वाचे असणार आहेत. २८ आणि २९ जून रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच कोकण या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Update 27 June
Maharashtra Weather Update: उकाड्यापासून दिलासा मिळणार! राज्यात 'या' तारखेपासून मुसळधार पावासाचा अंदाज

सोमवारी घेतली विश्रांती

सोमवारी देखील मुंबईला (Mumbai) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. मात्र सोमवारी पावसाने विश्रांती घेतली. सोमवारच्या विश्रांतीनंतर आज मंगळवारी पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. काल रात्री देखील मुंबईच्या काही उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडला.

काल पाऊस (Rain) जास्त नसल्याने हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात पावसाची नोंद झाली नाही. सांताक्रूज केंद्रात २७.० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांना मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

Weather Update 27 June
Weather Alerts : हवामानाचे लाईव्ह अपडेट मिळणार एका क्लिकवर, फोनमध्ये ही सेंटिग्ज ऑन करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com