Cyber Fraud : स्टील कंपनीचा विक्रेता असल्याचे भासवून फसवणूक; सव्वाचार लाखात गंडविले

Shirpur News : शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील डॉ. धीरज बाविस्कर यांच्या फार्मसी महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यामुळे त्यांना लोखंडी सळ्यांची गरज आहे.
cyber crime
cyber crimeSaam tv
Published On

शिरपूर (धुळे) : टाटा स्टील कंपनीचा अधिकृत विक्रेता असल्याचे भासवून तीन जणांनी एकाची तब्बल सव्वाचार लाख रुपयात फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दहिवद (ता. शिरपूर) येथील एसआरबी स्कूलचे संचालक डॉ. धीरज बाविस्कर यांची फसवणूक झाल्याचा हा प्रकार ३ जूनला घडला आहे. याप्रकरणी तीन संशयितांविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

cyber crime
Latur Bajar Samiti : लातूर बाजार समितीचे १०० कोटींचे नुकसान; आडते- खरेदीदारांच्या वादात १४ दिवसांपासून व्यवहार बंद

शिरपूर (Shirpur) तालुक्यातील दहिवद येथील डॉ. धीरज बाविस्कर यांच्या फार्मसी महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यामुळे त्यांना लोखंडी सळ्यांची गरज आहे. यामुळे त्यांनी इंटरनेटवर इंडिया मार्ट या संकेतस्थळावर जाऊन टाटा स्टील सप्लायर्सचे अधिकृत वितरक अशा नावाने नितीन गुप्ता नामक व्यक्तीचा पत्ता आढळला. त्याच्याशी संपर्क केल्यावर त्याने वितरक असल्याचे सांगत सहाय्यक दयाशंकर मिश्रा याच्याशी संपर्क करण्यास सांगितले. त्यानुसार डॉ. बाविस्कर यांनी मिश्राला फोन करून आवश्यक साहित्याची यादी दिली. त्यानुसार मिश्राने त्यांना स्टीलच्या लेटरहेडवर कोटेशन पाठवून चार लाख २४ हजार ३७० रुपये आधी भरण्यास सांगितले. 

cyber crime
Manmad Rain : पावसाअभावी मका पिक पडू लागली पिवळी; मनमाड परिसरातील चित्र

कोटेशन देण्यासोबत टाटा स्टील लिमिटेड, अंधेरी (मुंबई) या नावाने (Cyber Fraud) एचडीएफसी बँकेत खाते असल्याचे नमूद केले. त्याचा क्रमांक आणि आयएफएसी कोडही पाठविला. यावर विश्वास ठेवून ३ जूनला बाविस्कर यांनी दहिवद येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेतुन टाटा स्टीलच्या नावे धनादेश जमा केला. धनादेश दिल्याच्या माहितीसह खरेदीची ऑर्डर त्यांनी दयाशंकर मिश्रा याला पाठविली. दरम्यान साहित्य न मिळाल्याने बाविस्कर यांनी मिश्राशी संपर्क केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे बाविस्कर यांनी टाटा स्टीलच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती घेतली असता कंपनी कोणत्याही एजंटमार्फत ऑर्डर किंवा रक्कम स्वीकारत नसल्याचे सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बाविस्कर यांनी बँक ऑफ बडोदाच्या शाखेत जाऊन तपास केला. त्यावर संबंधित बँक खाते टाटा स्टीलचे नसून आकाश माळी (रा. पाटणा, बिहार) या व्यक्तीचे असल्याचे निष्पन्न झाले. बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून, संशयित नितीन गुप्ता, दयाशंकर मिश्रा, आकाश माळी (रा. पाटणा, बिहार) यांच्याविरोधात थाळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com