संदीप भोसले
लातूर : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागच्या १४ दिवसांपासून बाजारात शेतमालाचे सौदे बंद आहेत. यामुळे बाजार समितीला साधारण शंभर कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी आडते आणि खरेदीदारांत वाद होत असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बाजार समितीतील व्यवहार कधी सुरु होतील हे सांगणे अद्याप निश्चित नाही.
लातूर (Latur) येथिल कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीसाठी अतिशय विश्वासाची मानली जाते. नांदेड, धाराशिव, बीड, परभणी (Parbhani) यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमावरती भागातून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी शेतकरी आणत असतात. मात्र आडत्यांना खरीदाराकडून वेळेत पैसे मिळत नसल्याने खरेदीनंतर तीन दिवसात रक्कम मिळावी; यासाठी अडते आणि खरेदीदार यांच्यात वाद सुरू झाला आहे. त्यामुळे मागच्या १४ दिवसापासून बाजार समिती कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.
लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bajar Samiti) मागच्या १४ दिवसापासून संप सुरू आहे. आडते आणि खरीददारांच्या वादात शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे मागच्या १४ दिवसापासून कुठल्याच शेतमालाचे सौदे झाले नसल्याने बाजार समितीला तब्बल १०० कोटींचे नुकसान झाले आहे. शिवाय बाजार समितीचे प्रचंड मोठं नुकसान झाले आहे. तर शेतकऱ्यांची (Farmer) मोठी गैरसोय झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.