IPL सट्टेबाजावर मोठी कारवाई, भाजप नगरसेवकाला बेड्या; बडे मासे गळाला लागण्याची शक्यता

IPL betting racket, Ichalkaranji : इचलकरंजीमध्ये आयपीएल सामन्यांवर ऑनलाईन सट्टा चालवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. भाजप नगरसेवकासह ९ जणांना अटक करण्यात आली असून ८६ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
IPL betting racket, Ichalkaranji
IPL betting racket, IchalkaranjiSaam TV Marathi
Published On

Maharashtra IPL Betting Racket Shock: आयपीएल (IPL) सामन्यांवर ऑनलाईन सट्टा चालवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा शिवाजीनगर पोलीस आणि विशेष तपास पथकाने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. इचलकरंजी शहरातील एका फुटवेअर गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर पोलिसांनी धाड टाकली. आतापर्यंत तब्बल ८६ लाख ९३ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ९ आरोपींना अटक केली आहे. याचे धागेदोरे थेट गुजरात, मुंबई आणि बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एका नगरसेवकालाही अटक केली आहे.

आमदारांचे समर्थक भाजपचा नगरसेवक नितेश उर्फ गोट्या पोवार अटक

इचलकरंजी शहरात आयपीएल बेटिंग रॅकेटवर अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आमदारांचे समर्थक आणि भाजपचा नगरसेवक नितेश उर्फ गोट्या पोवार यांच्यासह तब्बल नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या कारवाईदरम्यान तब्बल ५९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जिल्ह्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बेटिंगविरोधी कारवाई मानली जात आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

IPL betting racket, Ichalkaranji
पुणे हादरले! १३ जणांचा संशयास्पद मृत्यू, हडपसर-पिंपरी चिंचवडमध्ये शोककळा, धक्कादायक कारण समोर

महिनाभराच्या 'रेकी'नंतर कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, या सट्टेबाजीबाबत पोलिसांना महिनाभरापूर्वीच प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानंतर एका गुप्तहेराने दिलेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी या संपूर्ण रॅकेटची पडताळणी (Verify) केली. या बेकायदेशीर व्यवसायात नक्की कोण-कोण सामील आहे, याचा शोध घेण्यासाठी २ जणांच्या टीमने सलग ३० ते ३५ दिवस रेकी केली आणि सर्व माहिती गोळा केली. त्यानंतर २ अधिकाऱ्यांसह ६ अंमलदारांच्या 'विशेष पथकाने धाड टाकली.

२५ तारखेच्या सामन्यादरम्यान मोठी कारवाई

सर्व पुरावे हाती आल्यानंतर २५ तारखेला झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या सल्ल्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. या विशेष पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सट्टेबाजांच्या (बुकी) अड्ड्यावर थेट छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी आधी ६ आरोपींना अटक केली होती, तर आता आणखी ३ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण रॅकेटमध्ये एकूण १७ आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

IPL betting racket, Ichalkaranji
मोठी दुर्घटना! घरातल्या एसीचा अचानक स्फोट, माजी IAS अधिकाऱ्याचा होरपळून मृत्यू

अशी केली जात होती सट्टेबाजी

पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 'park247.com' आणि 'park333.com' या बेकायदेशीर संकेतस्थळांचा (Websites) वापर केला. या वेबसाईटच्या माध्यमातून ते ग्राहकांना आयडी (ID) आणि पासवर्ड पुरवून आयपीएल सामन्यांवर बेटिंग जुगार खेळण्यासाठी प्रोत्साहित करत होते.

१०४ संगणकांसह काय-काय झाले जप्त?

या धडक कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर तांत्रिक साहित्य आणि वाहने जप्त केली आहेत. ऑनलाईन बेटिंगसाठी खरेदी केलेले २६ लाख २८ हजार रुपये किंमतीचे १०४ संगणक संच (सीपीयू, की-बोर्डसह) जप्त केले. त्याशिवाय ५४ लाख रुपये किंमतीची ३ चारचाकी वाहने, ५ लाख ८० हजार रुपये किंमतीचे विविध कंपन्यांचे १२ मोबाईल हँडसेट आणि १५ हजार रुपयांचा लॅपटॉप जप्त केला. त्याशिवाय ७० हजार २३० रुपये रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली.

IPL betting racket, Ichalkaranji
Pune : काळजाचा थरकाप! पुण्यात २४ तासांत ८ जणांचा संशयास्पद मृत्यू; दोन सख्ख्या भावांचाही समावेश

मुद्देमाल जप्त आणि आंतरराज्य कनेक्शन

पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत बुकींकडून महागड्या गाड्या, मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम (कॅश), मोबाईल आणि लॅपटॉप असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सट्टेबाजीचे कनेक्शन थेट गुजरात आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांपर्यंत जोडलेले असल्याने पोलीस आता या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

या ९ आरोपींना ठोकल्या बेड्या

१. अमेय विलास बडवे (वय ३२, रा. प्रियदर्शनी कॉलनी)

२. गणेश प्रकाश पाटील (वय २७, रा. लायकर टॉकीज मागे)

३. अभिजीत विलास बडवे (वय ३०, रा. प्रियदर्शनी कॉलनी)

४. उत्तमसिंग प्रतापसिंग बग्गा (वय ३८, रा. गणेशनगर)

५. याकुब अब्दूल मुजावर (वय ४८, रा. मगदुम दर्गाजवळ)

६. ऋषभ उमेश पाटील (वय २६, रा. जवाहरनगर)

७. नितेश उर्फ गोट्या किरण पोवार (वय ३६, रा. नवीन कोल्हापूर नाका)

८. मनिष भरत सांगावकर (वय ३२, रा. जवाहरनगर)

९. सचिन सदाशिव हरगापुरे (वय २४, रा. बावडेकर मळा)

IPL betting racket, Ichalkaranji
Pune : लग्नासाठी भररस्त्यात तरुणाचे अपहरण; तरुणीसह ७ जणांना बीडमधून अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com