Maharashtra Live News Update: पालघरमध्ये बिबट्या वाडीतील तारेच्या कुंपणात अडकला

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

पालघरमध्ये बिबट्या वाडीतील तारेच्या कुंपणात अडकला

पालघरच्या बोर्डी घोलवड परिसरात बिबट्या वाडीतील तारेच्या कुंपणात अडकला . तारेच्या कुंपणाला अडकलेल्या बिबट्याला तासाभरानंतर स्वतःची सुटका करण्यात यश . बिबट्याला बघण्यासाठी स्थानिकांची मोठी गर्दी . सुटका केल्यानंतर बिबट्याने वाडीसह जंगल परिसरात काढला पळ . तासभर तारेच्या कुंपणाला बिबट्या अडकला असताना देखील वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी कोणतेही प्रयत्न केला नसल्याचा स्थानिकांचा आरोप. मागील अनेक महिन्यांपासून बोर्डी परिसरात बिबट्याचा वावर . स्थानिक नागरिकांमध्ये भीतीच वातावरण.

shirdi : साई चरणी 1 कोटी रुपयांचा सुवर्ण मुकुट अर्पण...

साई चरणी 1 कोटी रुपयांचा सुवर्ण मुकुट अर्पण...

अमेरिका स्थित साईभक्त अंकिता राजेंद्र पटेल यांच्याकडून सुवर्णदान...

700 ग्रॅम वजनाचा 1 कोटी 38 हजार रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट अर्पण...

साईबाबा संस्थानकडून दानशूर साईभक्ताचा सत्कार...

मुंबईत तरुणाची हत्या

भांडुप मध्ये शंकर प्रसाद नामक युवकाची हत्या(कली)

जुन्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती

22 स्टेपिंग करून करण्यात आली हत्या

शंकर प्रसाद (कली) याला जवळील रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी केले मयत घोषित

बार्शीनंतर माढ्यातही दोन्ही शिवसेना एकत्र

सोलापूर जिल्हातल्या  बार्शीनंतर आता माढ्यात देखील दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली आहे.

विकास गोगावले यांना जामीन मंजूर

महाड नगर पालिका निवडणूक राडा प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह अटक केलेल्या शिवसेनेच्या आरोपींना जामीन मंजूर

शुक्रवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही गटातील 13 आरोपी पोलिसांना शरण गेले होते

विकास गोगावले यांच्या सह शिवसेनेच्या 8 आरोपींना जामिन मंजुर तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी

तांबाळा जिल्हा परिषद गटातील काँग्रेस उमेदवार यांचा अपहरण झाल्याचा संशय

लातूरच्या निलंगा तालुक्यातील तांबडा जिल्हा परिषद गटातील एसटी प्रवर्गातील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अंजना चौधरी यांचं अपहरण झाल्याचा संशय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून प्रचाराला जाण्यासाठी उमेदवार बाहेर पडल्या मात्र त्यानंतर त्या घरी आल्या नाहीत त्यामुळे, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत निवेदन दिले आहे, तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी अगदी दोन दिवस शिल्लक असताना अशा प्रकारची घटना घडल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

धाराशिवमध्ये शिवसेनेच्या दोन गटात मोठा राडा 

धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीआधीच शिवसेनेचे नेते अजित पिंगळे आणि अविनाश खापे हे दोन गट आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली असून परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. शिवसेनेतील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर हा वाद अधिकच पेटल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली असून, स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण तापले आहे.

भगत सिंह कोश्यारी यांना पद्मभूषण

माजी महाराष्ट्र राज्यपाल आणि उत्तराखंडचे राजकीय नेते भगत सिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यासाठी निवडण्यात आले आहे. हे सन्मान 2025 च्या पद्म पुरस्कार सूचीमध्ये घोषित करण्यात आले आहे.

अतिवृष्टीचा द्राक्ष उत्पादनावर परिणाम, वाईन महागण्याची शक्यता

नाशिक जिल्ह्यात सहा महिने सतत झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात 60 ते 65 टक्के घट झाली आहे. याचा थेट परिणाम वाईन उद्योगावर होणार असून, वाईन उत्पादनात 50 ते 60 टक्के घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी अडीच ते तीन कोटी लिटर वाईन तयार होणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. द्राक्षांच्या तुटवड्यामुळे बेदाणा व्यावसायिक आणि वाईन उद्योगात खरेदीसाठी स्पर्धा वाढणार असून, द्राक्ष उत्पादकांना प्रति किलो सुमारे दोन रुपये अधिक दर मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महाग दराने द्राक्ष खरेदी करावी लागल्याने वाईनच्या दरात वाढ होण्याचे संकेत ऑल इंडिया वाइन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी दिले 

शिंदेसेनेच्या विजयी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची घेतली भेट

शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार या दोन्ही पक्षांचा गट स्थापन करण्याच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे, यासंदर्भात आधी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे, त्यानंतर शिंदे सेनेच्या विजयी नगरसेवकांनी आमदार मंजुळा गावित त्याचबरोबर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतले आहे त्यामुळे आता विरोधी पक्ष नेते पदासाठी मुंबईतून खलबत्त सुरू झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे,

औरंगजेबाच्या क्रूरतेला गुरु गोविंदसिंग घाबरले नाही- देवेंद्र फडणवीस

पुण्यात हिट अँड रन! सायकल स्पर्धेसाठी काढलेले गतिरोधक पुन्हा बसवा नगरसेवकाची महापालिकेला मागणी

पुण्यात आयोजित केलेली ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेसाठी रस्त्यातील गतिरोधक काढून टाकण्यात आले होते. ही स्पर्धा संपल्यानंतर आता हे गतिरोधक पुन्हा बसवावे आणि अपघातांचा धोका कमी करावा अशी मागणी माजी सभागृहनेते, नगरसेवक नीलेश निकम यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. ‘

दावोसहून नंदुरबारसाठी 4 हजार कोटींची गुंतवणूक

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथून नंदुरबार जिल्ह्यासाठी तब्बल ४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. जिल्ह्यात रोजगाराच्या संधी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मजुरांचे स्थलांतर होत असताना, ही गुंतवणूक नंदुरबार जिल्ह्यासाठी आशेचा किरण ठरणार आहे. गुंतवणुकीमुळे सातपुडा भागातील दुर्गम परिसरात रोजगारनिर्मिती होऊन विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

Kolhapur: कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत बुडणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचवले

कोल्हापूर -

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत बुडणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचवले

पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे यांनी पंचगंगा नदीत पोहत जात महिलेला वाचवले

शहाणा रफिक शेख (वय- 38) अस बुडणाऱ्या महिलेच नाव

लक्ष्मीपुरी पोलिसांना डायल ११२ वर इमर्जन्सी कॉल प्राप्त होताच चार्ली १ च्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बुडणाऱ्या महिलेला दिले जीवनदान

Dharashiv: शिवसेनेचे पक्ष निरीक्षक राजन साळवी यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

धाराशिव -

शिवसेनेचे पक्ष निरीक्षक राजन साळवी यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

चुकीचे तिकीट वाटप केल्याचा राग धरत शिवसैनिकाचा घेराव घातल्याचा व्हिडिओ व्हायरल

शिवसेनेचे एबी फॉर्म राजन साळवी यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील व मल्हार पाटील यांना देत वाटप केल्याच्या मुद्द्यावरन शिवसेनेचा कार्यकर्ता व राजन साळवी यांच्यातील वादग्रस्त कथित ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर दुसरा व्हिडिओ वायरल

जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकांना डावल्याने शिवसैनिक आक्रमक

Chandrapur: चंद्रपुरातील शिवसेना नगरसेवकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

चंद्रपुरातील शिवसेना नगरसेवकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

चंद्रपुरातील ठाकरे सेना आणि वंचित युतीच्या आठ नगरसेवकांसह दोन अपक्षांनी काही वेळापूर्वी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी संजय राऊत यांच्यासोबतच एकूण दहा नगरसेवक उपस्थित होते.

आपल्याला जो पक्ष सन्मानाने सहकार्य करेल, अशा पक्षासोबत सत्ता स्थापन करा आणि स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे सांगितले जाते.

एकाही पक्षाला बहुमत नसल्याने ठाकरे सेनेला चंद्रपुरात महत्व प्राप्त झाले आहे.

Kalyan: कल्याणमध्ये वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

कल्याण -

दुर्गाडी चौक परिसरातील घटना

वाहतूक पोलिस कर्मचारी विलास भागीत यांना बेदम मारहाण

रॉंग साईडने गाडी का घेऊन जात आहे जाब विचारल्याने चार तरुणांनी मारहाण केल्याची माहिती

पोलीस कर्मचारी विलास भागीत यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

बाजारपेठ पोलिसांनी केला गुन्हा दाखल

आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथक रवाना

मारहाण करणारे तरुण शिवसेना शिंदे गटाच्या एका नगरसेवकाचे समर्थक असल्याची माहिती

Beed:  बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरच घाणीचे मोठे साम्राज्य, पोलिसांचे आरोग्य धोक्यात

- बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरच घाणीचे मोठे साम्राज्य

- पोलिसांसह आजूबाजूच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

- बीड शहरातील बीड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या समोरील बाजूस मोठ्या प्रमाणात नाल्यातील घान पाणी साठले आहे आणि त्यामध्ये मोठा प्लास्टिक, कचरा पडला आहे.

- यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून पोलीसांसह आजूबाजूला वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे देखील आरोग्य धोक्यात आले आहे.

- नगरपरिषदेने तात्काळ स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Kolhapur: जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी आणल्या जाणाऱ्या साड्यांच्या टेम्पोवर कारवाई

कोल्हापूर -

जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी आणल्या जाणाऱ्या साड्यांच्या टेम्पोवर कारवाई

करवीर तालुक्यातील भरारी पथकाने टेम्पो अडवून केली कारवाई

करवीर तालुक्यातील महिला मतदारांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाटल्या जाणार होत्या साड्या

साड्यांच्या पिशव्यांमध्ये आहेत स्थानिक उमेदवारांचे फोटो आणि हँडबिल्स

सात ते दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल भरारी पथकाने घेतला ताब्यात

करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द इथं भरारी पथकाने केली कारवाई

भरारी पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून पंचनामा सुरू

Sambhajinagar: संजय राऊत यांना महाराष्ट्राची संस्कृती आणि प्रोटोकॉल माहीत नाही संजय शिरसाट

पालकमंत्री संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद

संजय राऊत याला महाराष्ट्राची संस्कृती आणि प्रोटोकॉल माहीत नाही

सर न्यायाधीश जो महाराष्ट्रात आले तेव्हा एज प्रोटोकॉलनुसार त्यांचे स्वागत करणे हे मंत्रिमंडळाचे अधिकार आहेत आणि त्यांनी ते केले पाहिजे.

म्हणून एखाद्याचे स्वागत केले तर त्यांच्या कामकाजावर त्याचा कुठला परिणाम होत नाही

स्वागत केले म्हणजे निकाल बदलेल असे काही महाबाग बनत असतील तर त्यांचा हा मूर्खपणा आहे

परिवहन मंत्र्यांच्या परळ डेपो पाहणीत एसटीचे चालक वाहक मद्यधुंद अवस्थेत

परिवहन मंत्र्यांच्या परळ डेपो पाहणीत एसटीचे चालक वाहक मद्य धुंद अवस्थेत

संबंधित चालक वाहकांवर तात्काळ कारवाई करण्याचे प्रताप सरनाईक यांचे आदेश

ब्रेथ अनालायझरने सर्व चालक वाहकांची तपासणी करण्याचे देखील प्रताप सरनाईक यांचे आदेश

प्रताप सरनाईक यांना आढळल्या चालक वाहकांच्या रेस्ट रूममध्ये दारूच्या बाटल्या

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत बुडणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचवले

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत बुडणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचवले

पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे यांनी पंचगंगा नदीत पोहत जात महिलेला वाचवले

शहाणा रफिक शेख (वय- 38) अस बुडणाऱ्या महिलेच नाव

लक्ष्मीपुरी पोलिसांना डायल ११२ वर इमर्जन्सी कॉल प्राप्त होताच चार्ली १ च्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बुडणाऱ्या महिलेला दिले जीवनदान

पुणे महानगरपालिका निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव, राज ठाकरे भाकरी फिरवणार

पुणे महानगरपालिका निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव, राज ठाकरे भाकरी फिरवणार

पराभवानंतर मनसे करणार आत्मचिंतन

राज ठाकरे पुण्यात भाकरी फिरवणार

पुणे शहरात पक्षांतर्गत मोठे बदल होणार

एकाच प्रभागातून निवडून आलेल्या 2 भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्लेक्स लावण्यावरुन हाणामारी

एकाच प्रभागातून निवडून आलेल्या 2 भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्लेक्स लावण्यावरुन हाणामारी

पोलिसांनी दोन्ही गटांवर दाखल केले गुन्हे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नांदेड दौरा रद्द!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नांदेड दौरा रद्द

शिखांचे नववे गुरु तेग बहाद्दूरजी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त आयोजित हिंद दि चादर कार्यक्रमा निमित्त येणार होते नांदेडला.

काही तांत्रिक कारणास्तव दौरा रद्द झाल्याची सूत्रांची माहिती.

सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी

शनिवार , रविवार व प्रजासत्ताक दिनाच्या सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी

पर्यटन स्थळांपेक्षा धार्मिक स्थळांना भाविकांची जास्त पसंती

साईसमाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

देशभरातून साईभक्त शिर्डीत साईदर्शनासाठी दाखल

तुळजापुरात सलग सुट्यांमुळे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

तुळजापुरात सलग सुट्ट्यांच्या पाश्र्वभूमीवर भाविकांच्या गर्दीत वाढ झाली आहे.शनिवार,रविवार व 26 जानेवारी या सलग सुट्ट्या लागुन आल्याने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. तुळजापुर हे साडेतीन शक्ती पिठापैकी एक पुर्ण पिठ आहे.देवीचा कुलधर्म कुलाचार करण्यासाठी राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने तुळजापूरात येत असतात.तुळजापुरात झालेल्या गर्दीमुळे तुळजापूर नगरी भाविकांनी फुलुन गेली आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

मंदिरापासून त्र्यंबकेश्वर गावात 4 ते 5 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा

एका भाविकाला दर्शनासाठी लागतोय तब्बल 8 ते 9 तासांचा वेळ

26 जानेवारी आणि सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी

नाशिकमध्ये यांत्रिक मशीन द्वारे कांदा लागवड

कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात बहुतांश शेतकरी नगदी पीक म्हणून कांदा लागवड करीत असतात,सध्या अनेक भागात उन्हाळी कांद्याची लागवड सुरू झाली आहे.

मात्र लागवडीसाठी मजुरांची टंचाई,वाढीव मजुरी हे शेतकऱ्यानं साठी डोकेदुखी ठरत असल्याने नाशिकच्या येवला तालुक्यातील शेतकरी हरिभाऊ महाजन यांनी थेट यांत्रिक पद्धतीने कांदा लागवड करण्यास सुरुवात केलीय.

पुण्यात नगरसेविकेच्याच भावावर हल्ला

पुण्यात नगरसेविकेच्याच भावावर हल्ला

बॅनर लावण्यावरून झाला होता वाद त्यावरून केली मारहाण

टोळक्याने हल्ला करून बेदम मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे

१४ ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक;भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाली असून एकाच दिवशी तब्बल 836 ट्रक कांदा बाजारात दाखल झाला आहे.यंदाच्या हंगामातील ही आतापर्यंतची सर्वाधिक आवक ठरली आहे.कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे बाजार समितीत माल उतरविण्यास वेळ लागत असून त्याचा परिणाम लिलाव प्रक्रियेवर झाला आहे.लिलावास उशीर होत असल्याने तसेच बाजारात पुरवठा जास्त झाल्याने कांद्याचे दर घसरले आहेत.सध्या हंगामातील नवा कांदा बाजारात दाखल होऊ लागल्याने आवक सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कांद्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल 2,200 रुपये,तर सर्वसाधारण कांद्याला किमान 900 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळत आहे.मात्र गेल्या महिनाभरात कांद्याच्या दरात तब्बल दोन ते अडीच हजार रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे.मिळणारा भाव उत्पादन खर्चालाही पुरेसा नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे चित्र आहे.

शिवसेनेचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत यांना पुतणे धनंजय सावंतांचा निर्वाणीचा इशारा

अध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी ते आधी आचरणात आणावेत…असं म्हणत पुतणे धनंजय सावंत यांनी काका आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना थेट निर्वाणीचा इशारा दिलाय

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत धनंजय सावंत यांनी हे वक्तव्य केलय

धृतराष्ट्राजवळ जसा एक संजय होता, तसाच आजच्या नेत्यांजवळही संजय आहे… असं म्हणत आमदार तानाजी सावंत यांच्या बगलबच्च्यांनाही धनंजय सावंतांनी सुनावलं

सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी

सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पंढरपुरात विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. सुमारे दोन लाख भाविक पंढरपुरात आले आहेत. विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रोडवरील पत्रशेड पर्यंत गेली आहे. दर्शनासाठी पाच तासांचा अवधी लागत आहे. शनिवार, रविवार आणि उद्या भारतीय प्रजासत्ताक दिनाची सलग सुट्टी आल्याने पंढरपुरात गर्दी वाढली आहे. पंढरपुरातील सर्व मठ धर्मशाळा भाविकांनी भरून गेली आहेत. दरम्यान मंदीर परिसरात फेरीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थटाल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पुणे जिल्ह्यात 67 हजार दुबार मतदारांची नोंदणी

जिल्हा परिषद पंचायत समिती साठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत 67 हजार दुबार नावे

दुबार मतदान रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

जिल्हा प्रशासन दुबार मतदारांकडून घेणार हमीपत्र

मतदारांकडून एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याचे हमीपत्र राज्य निवडणूक आयोगात करून लिहून घेतले जाणार आहे

जिल्ह्यात एकूण 29 लाख 76 हजार 454 मतदार आहेत त्यापैकी 67 हजार 12 मतदारांची नावे दुबार आहेत

मालाड रेल्वे स्थानकातील प्राध्यापक हत्या प्रकरणातील आरोपी अवघ्या १२ तासांत अटकेत

मालाड रेल्वे स्थानकात किरकोळ वादातून आलोक सिंग या प्राध्यापकाची चाकू हल्ल्यात हत्या करणारा फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक केली आहे.

ग्रामपंचायतीतील प्रलंबित कामांवरून चौथ्यांदा बेमुदत उपोषण..

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या टेंभुर्णा ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगातील विकासकामे, तसेच स्वच्छता, पाणीपुरवठा आदी अत्यावश्यक सेवांची कामे मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सरपंच भारती श्रीकृष्ण मोरे यांनी चौथ्यांदा बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण दि. २३ जानेवारी २०२६ पासून पंचायत समिती कार्यालय, खामगांव समोर सुरू करण्यात आले आहे..

nashik-malegaon-मालेगाव महापालिकेतील गटनेत्यांची पक्षांकडून निवड करण्यात आली

महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी वेगाने घडामोडी घडत असून वेगवेगळ्या पक्षां तर्फे गट नेते पदाची निवड ही करण्यात आली असून त्यात इस्लाम पार्टीच्या गट नेते पदी खालिद शेख, समाजवादीच्या गटनेते पदी मुस्तकीम डिग्निटी तर एमआयएमचे गटनेते पदी माजी महापौर अब्दुल मलिक यांची निवड करण्यात आली आहे,तर काल रात्री उशिरा शिवसेनेच्या गटनेते पदी माजी उपमहापौर निलेश आहेर यांची निवड करण्यात आली असून,महापालिकेच्या महापौर पदाची निवड ३०-३१ जानेवारी रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमरावतीमध्ये भाजपाचा महापौर बनवण्यासाठी सर्व पक्षांना बावनकुळे यांची खुली ऑफर

अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त 25 जागा मिळालेल्या आहे, भाजपचाच महापौर व्हावा असं जनतेने कौल दिला आहे, सर्वात जास्त जागा भाजपाला दिल्या आहे, अमरावतीचा महापौर बनवण्याकरिता ज्या ज्या पक्षाला आम्हाला सहकार्य करायचा असेल त्या पक्षाचं आमच्याकडे स्वागत आहे असे म्हणत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापौर पदासाठी सर्व पक्षांना खुली ऑफर दिली आहे.मात्र यावेळी त्यांनी एमआयएम सोडून सर्व पक्षांचे स्वागत आहे असा उल्लेख देखील केला. एम आय एम ला वाटले तरी आम्ही त्यांचा पाठिंबा घेणार नाही,ते त्यांचं पाहत बसतील असं देखील बावनकुळे यांनी सांगितलं. भाजपचा महापौर व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय खोडके आमदार रवी राणा, बहुजन समाज पार्टी, आणखी काही अपक्ष असतील तर त्यांना देखील विनंती करणार आहोत, असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल. भारतीय जनता पक्ष रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष व शिवसेना शिंदे ,राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे नगरसेवक एकत्र आले तरी आम्ही सरकार बनवू शकतो असे देखील बावनकुळे यांनी सांगितले

किल्ले रायगडावर पर्यटकांची तुफान गर्दी

सलग तीन दिवस असलेल्या सुट्टयांमुळे पर्यटन स्थळ गजबजली आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर देखील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.

पूर्णा नदी वरील पुलावर पुन्हा पुन्हा वाहतुकीची कोंडी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदी वरील पुलावर पुन्हा पुन्हा वाहतुकीची कोंडी होत असल्यानं वाहनचालक, प्रवासी वैतागले आहेत. छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर सिल्लोड तालुक्यातील भवन येथे काल दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान पुन्हा मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पूर्णा नदीच्या पुलावर एक महाकाय कंटेनर अचानक नादुरुस्त झाल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल तीन तास चाललेल्या या कोंडीमुळे प्रवासी आणि पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

या वाहतूक कोंडीत अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेले देश-विदेशातील पर्यटक अडकून पडले होते. यामुळे शेकडो वाहन चालक व प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त होत आहे

सिंधुदुर्गात जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप–शिवसेना महायुतीचे तब्बल पाच जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपचे चार तर शिवसेना शिंदे गटाचा एक जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. यासोबतच सहा पंचायत समिती सदस्यही बिनविरोध निवडून आल्याने एकूण अकरा जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून आल्याने महायुतीने ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे.

रंगाबद्दल आक्षेप नाही मात्र त्यातून धार्मिक सामाजिक विद्रोह निर्माण करत असाल तर महाराष्ट्र सहन करणार नाही, जलील यांना बावनकुळे यांचा इशारा

एमआयएमच्या नगरसेविका सहर यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवा करू असं नुकतेच वक्तव्य केलं तर एम आय एम चे नेते इम्तियाज जलील यांनीआम्ही सहर यांच्या पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया दिली यावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली...

अमरावतीचा महापौर भाजपचाच होईल - चंद्रशेखर बावनकुळे

अमरावतीचा महापौर भाजपचाच होईल..यासाठी लागणारे आमचे मित्र पक्ष आम्हाला मदत करतील आणि भाजपचा महापौर बसेल..

जागा का कमी झाल्या यासाठी प्रदेशातून एक समिती अमरावतीत येणार आहे..

निवडणूकित जागा का कमी झाल्या कोर कमिटी सोबत अडीच तास चर्चा केली.. त्यात पराभवाचे कारण आम्ही शोधले..पराभूत उमेदवारांचे सुद्धा आम्ही त्यांचे मत घेणार आहोत... पराभवाचे विश्लेषण आम्ही करणार आहोत...

जागा वाटप मध्ये आम्ही अनेकांना तिकडे देऊ शकलो नाही पण दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणुका लढणे हे काही बरोबर नव्हतं... आमचे लोक वेगळ्या पक्षात जाऊन अपक्ष उभे राहिले तर काही वेगळ्या पक्षात जाऊन उभे राहिले,आठ ते दहा जागा आमच्या 200 मतांच्या आत होत्या ज्याठिकाणी आमचं पराभव झालेला आहे...

भाजप जिल्हाध्यक्षांनी महसूल कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली, गुन्हा दाखल

भारतीय जनता पार्टीचे हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे यांनी महसूल कर्मचाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात येत आहे, याप्रकरणी महसूल कर्मचारी रवी गुट्टे यांच्या तक्रारीवरून माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेल्या गजानन घुगे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे कळमनुरी पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.

अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर तासभर गोंधळ

अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर काल रात्री एक प्रकार घडलाय.. त्यामुळं जवळपास तासभर रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला.. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांसह पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ झाली..

कौंटुबिक वादाला कंटाळून एका व्यक्तीने अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या ब्रिज वरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न करीत होता, सुदैवाने रेल्वे पोलिसांनी आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवले खरी. जवळपास तासभर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु होताय..

तिकडं ब्रिजच्या बाजूने रेल्वेची हाय होल्टेज तार होती.. दुसरीकडे बराच वेळ समजावून सांगूनही तो ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. तो स्वतः बद्दल कोणतीही माहीती देत नव्हता. तो कोणत्याही क्षणी खाली उडी मारू शकत असताना त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तर हाय होल्टेज तारेच्या संपर्कात येताच त्याचा जीव धोक्यात येईल, असा अंदाज पोलिसांना होताय.

कोळसा वाहतुकीमुळे कपाशी काळवंडली

यवतमाळच्या वणी कोल्हारपिंपरी मार्गावर महिन्याला साडेतीन ते चार लाख मॅट्रिक टन कोळशाची वाहतूक केली जाते, परिणामी उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील शेती करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून अक्षरशः श्वास गुदमरत आहे ही कोळसा वाहतूक होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये कोळशाची धूळ शेतातील पिकांवर उडते त्यामुळे ही धूळ जीवावर बेतणारी ठरत आहे.अनेकांना श्वसनाचे आजार जडले आहे. पिके काळवंडली आहेत एवढे नुकसान होऊ सुद्धा शेतकऱ्यांना कोणताही मोबदला दिला जात नाही,यामुळे तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.

मांदवलीत बॉक्‍साईटमुळे ग्रामस्थ पुन्हा आक्रमक

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातल्या मांदिवली गावात शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आहे. उर्दू शाळेजवळून सुरू असलेल्या बॉक्‍साईट वाहतुकीमुळे प्रचंड धूळ, धूर आणि ध्वनीप्रदूषण पसरले असून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या दखलेनंतर चौकशी समिती गावात दाखल झाली खरी, पण चौकशीच वादाच्या भोवऱ्यात अडकली. समितीसमोरच नागरिक आक्रमक झाल्याने निष्कर्ष काढण्याआधीच समितीने काढता पाय घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते भावेश कारेकर आणि ॲड. अर्पिता कारेकर यांनी उपस्थित केलेल्या थेट प्रश्नांना बगल देत चौकशी अर्धवट सोडली गेल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे.“न्याय मिळेपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही,” असा ठाम इशारा पालकांनी दिला असून ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.मानवाधिकार आयोगाच्या हस्तक्षेपानंतरही प्रशासन गप्प का?की विद्यार्थ्यांचे भवितव्य खरंच धुळीतच जाणार? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

यवतमाळ जिल्ह्यात 11 ठिकाणी होणार प्रक्रिया

हमीभावाने तुर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार असून त्यासाठी शासनाने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.यवतमाळ जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून तुरीची खरेदी होणार आहे.यासाठी 11 केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे,या केंद्रावर 20 फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहेत.

Maharashtra Live News Update: महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार निश्चित

महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार,फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार निश्चित

30 जानेवारीला महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार

तर 4 फेब्रुवारी ही महापौर निवडीची तारीख, मात्र यामध्ये एक दोन दिवस मागेपुढे बदल होण्याची शक्यता..?

नागपूर महानगरपालिकेत महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेकांच्या आकांक्षा वाढल्या आहेत..

भाजपमध्ये सध्या महापौर पदासाठी अनेक नाव चर्चेत, यामध्ये शिवानी दानी, विशाखा मोहोड, जेष्ठ नगरसेविका नीता ठाकरे, दिव्या धुरडे, अश्विनी जिचकार, साधना बरडे यांचेही ही नावे चर्चेत..

मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापौरपदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे पाहणे महत्त्वाचे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com