आझाद मैदानावर मराठा-OBC भिडणार? राज्यात पुन्हा आरक्षणाचं राजकारण तापणार

Maharashtra Reservation Politics: मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आणि ओबीसी समाजाच्या आंदोलनांमुळे महाराष्ट्रातील आरक्षणाचं राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. पोलीस परवानगीवरूनही संघर्षाची चिन्हं आहेत.
Maharashtra Reservation Politics:
Maratha OBC reservation protest at Azad Maidan Mumbai latest updatesaam tv
Published On
Summary
  • मराठा आणि ओबीसी समाजाच्या आंदोलनांमुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

  • आरक्षण मिळवण्यासोबतच विद्यमान आरक्षण टिकवण्याच्या मागणीवरून दोन्ही बाजूंमध्ये मतभेद

  • मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा महाराष्ट्राच्या राजकीय केंद्रस्थानी

राज्यात पुन्हा एकदा आरक्षणावरून राजकारण तापणार आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने येणार आहेत. मात्र, पोलीस परवानगीवरून दोन्ही समाजात कुरघोडी सुरू आहेत. त्यामुळे आरक्षण मिळवण्याच्या आणि टिकवण्याच्या लढाईत कोण बाजी मारणार ?पाहूयात यावरचा एक रिपोर्ट.

मंबईतल्या आझाद मैदानावर मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांना भिडण्याची चिन्हे आहेत. कुणबी नोंदींवरून मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनीही आंदोलनाची हाक दिलीये. मराठा आरक्षणावरून जरांगेंनी आझाद मैदानातील आंदोलनाच्या परवानगीसाठी पोलिसांना पत्रही लिहलयं.

Maharashtra Reservation Politics:
महाराष्ट्रात 2 कोटी मतदार वगळणार? 'अल्पसंख्यांकांना टार्गेट करण्यासाठी SIR' , वडेट्वीवारांचा आरोप

त्यामुळे जरांगेंचं 29 ऑगस्टचं आंदोलन नियोजित अंतरवाली सराटीत न होता मुंबईत होण्याची चिन्हे आहेत. मराठ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना ओबीसी समाजानेही एक पाऊल पुढे टाकलंय. लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर टीका करत 1 सप्टेंबरला चलो मुंबईचा नारा दिलाय. यासाठी ओबीसी आंदोलकांनी जरांगेंच्या आधीच आझाद मैदानासाठी पोलीसांकडे परवानगी मागितलीये.

Maharashtra Reservation Politics:
Manoj Jarange: मुंबईत पुन्हा आरक्षणावरून संघर्ष; आंदोलनासाठी मनोज जरागेंचं पोलिसांना पत्र

राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकारण तापलंय. एकीकडे अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे, आझाद मैदानावरून मराठा आणि ओबीसी समाज आमनेसामने आले आहेत. विशेष म्हणजे, मराठा आणि ओबीसी संघटनांनी आधीच आझाद मैदानासाठी अर्ज केल्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाल्याचं बोललं जातंय. दोन्ही समाजांनी आझाद मैदानाची मागणी केल्यानं पोलीस प्रशासन कोणाला परवानगी देणार आणि आझाद मैदानावर मराठा-ओबीसी एकमेकांना भिडणार का?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com