

मनोज जरांगे पाटील यांची सरकारवर टीका
अभिजीत दीपके यांना दिल्ली विमानतळावर अटक
आंदोलन मोडून काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप
अक्षय शिंदे, साम प्रतिनिधी
दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासला अटक केली. अभिजीत दीपके यांचे विमान दिल्ली विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी थेट विमानात जाऊन त्यांना अटक केली. दीपकेंना अटक करताच विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका केली जातेय. आता मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारवर टीकेची झोड उठवलीय. जरांगेंनी सरकार थेट गुंड म्हटलंय.
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत आहे, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. जालन्यात ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारला मनमानी करायची आहे. सरकारला दादागिरीने लोकशाही मार्गाने होणारे आंदोलन मोडून काढायचंय, असं जरांगे म्हणालेत. सरकार म्हणेल त्या पद्धतीने आंदोलन चालले पाहिजे, या भूमिकेत सध्या सरकार आहे. सरकारला विद्यार्थ्यांचे आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवायचे नाहीत. अभिजीत दीपकेंना अटक करणे म्हणजे सरकारला आंदोलन मोडून काढायचंय असा, आरोपही जरांगेंनी केलाय.
दीपके आणि सौरभ दास आणि आशुतोष रांका हे जंतर-मंतरवर आंदोलन करण्यासाठी मुंबईहून दिल्लीला निघाले होते. ते विमानाने दिल्लीत पोहोचताच दिल्ली पोलिसांनी विमानातूनच त्यांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, ते विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्यांना थेट विमानातूनच ताब्यात घेतल्याचा व्हिडीओ समोर आलाय. दिपके आणि त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेण्यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले होते. दिपकेंनी तुम्ही विमानात आलाच कसे? असा सवाल विचारला. विमानातील सर्व घडामोडीचे लाईव्ह सीजीपीद्वारे करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.