Abhijeet Dipke: ...इतकी भीती वाटत असेल तर देश बंद करा, अभिजीत दीपके का संतापले?

Abhijeet Dipke On CJP Protest: दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली तरी आमचे आंदोलन होणार अशी प्रतिक्रिया अभिजीत दीपके यांनी दिली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
Abhijeet Dipke: ...इतकी भीती वाटत असेल तर देश बंद करा, अभिजीत दीपके का संतापले?
Abhijeet Dipke On CJP ProtestSaam Tv
Published On: 
  • सीजेपीच्या आंदोलनापूर्वी दिल्लीतील ५७ मेट्रो स्टेशन बंद

  • मेट्रो आणि रेल्वे बंद करणाऱ्या मोदी सरकारवर अभिजीत दीपके संपातले

  • आंदोलनाची भीती वाटत असेल तर देश बंद करा, अभिजीत दीपके यांची संतप्त प्रतिक्रिया

  • सीजेपीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात सीजेपीने आंदोलनाची घोषणा केली. १० ऑक्टोबरला दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपीचे आंदोलन होणार आहे. या आंदोलनापूर्वी दिल्लीतील ५७ मेट्रो स्टेशन बंद करण्यात येणार आहेत आणि अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक पाऊलं उचलली जात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके चांगलेच संतापले. 'आमच्या आंदोलनाची इतकी भीती वाटत असेल तर देश बंद करा.', असे म्हणत त्यांनी थेट मोदी सरकारवर निशाणा साधला.

अभिजीत दीपके हे बंगळुरूतील आंदोलन संपल्यानंतर आज मुंबई विमानतलावर दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मोदी सरकारवर संतप्त प्रतिक्रिया दिली. आणीबाणीच्या काळात कधी रेल्वे बंद झाली नव्हती. या सरकारने आमच्या आंदोलनापूर्वी रेल्वे बंद केली. इतकी भीती वाटत असेल तर देश बंद करा. सरकार खूपच चिंतेत आहे. आमच्या आंदोलनामुळे सरकारला भीती वाटत आहे. पीएम मोदी आणि अमित शहा यांनी आपले ब्लड प्रेशर चेक करत राहिले पाहिजे. ज्ञानेश कुमार ऐवढे महत्वाचे का आहेत तुम्हाला?'

Abhijeet Dipke: ...इतकी भीती वाटत असेल तर देश बंद करा, अभिजीत दीपके का संतापले?
CJP च्या आंदोलनापूर्वीच पोलिसांची धरपकड; पदाधिकाऱ्यांना पहाटे घेतले ताब्यात

सीजेपीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली. यावर प्रतिक्रिया अभिजीत दीपके यांनी थेट मोदी सरकारलाच सवाल केले आहेत. 'आमचे आंदोलन होणारच आहे. जंतर मंतर हे आंदोलनासाठी निश्चित केलेले ठिकाण आहे. कलम १९ आम्हाला आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार देते. मग परवानगी घेण्याची काय गरज आहे? १३ कोटी मतदान वगळण्याआधी यांनी जनतेची परवानगी घेतली होती का?', असा सवाल दीपकेंनी केला.

Abhijeet Dipke: ...इतकी भीती वाटत असेल तर देश बंद करा, अभिजीत दीपके का संतापले?
CJP Protest: सीजेपीचे दिल्लीत पुन्हा आंदोलन, ५७ मेट्रो स्टेशन बंद; अनेक ट्रेन रद्द

तसंच, 'काल मी बंगळुरूवरून आलो. तिथे जिवंत लोकांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले होते. ते लोकं जिवंत आहेत. त्यांना विचारले होते का मतदार यादीतून नाव कापण्यापूर्वी त्यांना विचार होते. जे निवडणुकीत हेराफेरी करत आहेत त्यांच्याविरोधात आम्ही आंदोलन करू नये, असं तुम्हाला वाटत आहे का? पण हे शक्य नाही. आम्ही आंदोलन करणारच. देशाला वाचवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत.'

Abhijeet Dipke: ...इतकी भीती वाटत असेल तर देश बंद करा, अभिजीत दीपके का संतापले?
आंदोलनाआधी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! CJP ला दिला मोठा दिलासा, नेमका युक्तिवाद काय झाला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com