Manoj Jarange : बीपी आणि शुगर कमी झाल्यामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपचारास दिला नकार

Manoj Jarange Maratha Strike : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. उपोषणाच्या १९ व्या दिवशी बीपी आणि शुगर कमी झाल्याने प्रकृती खालावली असून उपचार व वैद्यकीय तपासणीस नकार दिल्याचे वृत्त आहे.
Manoj Jarange Patil Strike News
Manoj Jarange Patil Strike NewsSaam tv
Published On
Summary
  • मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 19 वा दिवस

  • जरांगे यांची प्रकृती खालावली

  • बीपी आणि शुगर कमी झाल्याची माहिती

  • मुंबईकडे जाण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून आज त्यांच्या उपोषणाचा 19 वा दिवस आहे. दरम्यान, काल सायंकाळपासून त्यांची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती समोर आली आहे. बीपी आणि शुगर कमी झाल्याने त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, प्रकृती अस्वस्थ असतानाही उपचार घेण्यास त्यांनी नकार दिल्याचे सांगितले जात आहे.

जरांगे पाटील सध्या बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्कामी आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या पुढील दौऱ्याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. सहकाऱ्यांमध्ये त्यांच्या प्रकृतीसह पुढील आंदोलन आणि मुंबईकडे जाण्याच्या नियोजनावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही जरांगे पाटील यांनी तपासणी करण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. बीपी आणि शुगर कमी झाल्याने वैद्यकीय तपासणी आणि उपचारांची आवश्यकता असल्याचे सांगितले जात असले, तरी जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे.

Manoj Jarange Patil Strike News
Gauri Aagman : गणपतीच्या कोणत्या बाजूला गौराईची प्रतिष्ठापना करतात, उजव्या की डाव्या? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

दुसरीकडे, मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी अद्याप मिळालेली नाही. मुंबई पोलिसांनी यापूर्वी त्यांचा परवानगी अर्ज नाकारला असून, त्यानंतर पुन्हा अर्ज करण्यात आला होता. मात्र, दुसऱ्यांदा देखील परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती आहे. परवानगीचा प्रश्न कायम असतानाही मुंबईकडे जाण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. आज परवानगी न मिळाल्यास त्यांच्या वकिलांकडून हायकोर्टात दाद मागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Manoj Jarange Patil Strike News
UPI Payment : UPI पेमेंटवर आता शुल्क; २००० रुपयांच्या व्यवहारावर MDR लागू; कोणाला, किती अन् कधी लागू होणार? जाणून घ्या A टू Z माहिती

आता एकीकडे जरांगे पाटील यांची ढासळलेली प्रकृती आणि दुसरीकडे मुंबई आंदोलनाच्या परवानगीचा प्रश्न, अशा दुहेरी परिस्थितीत पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होते का आणि मुंबईकडे जाण्याच्या त्यांच्या पुढील नियोजनाबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे समर्थकांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com