Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून मुंबईत जाण्याची घोषणा; ५ दिवसांत आझाद मैदानावर पोहचणार; कसा असेल मार्ग?

Manoj Jarange Mumbai march latest news: मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या १५ व्या दिवशी मोठी घोषणा केली. मुंबईला जाऊन आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून मुंबईत जाण्याची घोषणा; ५ दिवसांत आझाद मैदानावर पोहचणार; कसा असेल मार्ग?
Manoj JarangeSaam Tv
Published On
  • मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याची केली घोषणा

  • ५ दिवसांत आझाद मैदानावर पोहोचण्याचा निर्धार त्यांनी

  • अंतरवाली सराटी येथे मुंबई आंदोलनाच्या नियोजनासाठी महत्त्वाची बैठक पार पडली

  • बैठकीत मुंबईचा मार्ग, मुक्कामाची ठिकाणे आणि आझाद मैदानापर्यंत पोहोचण्याचे नियोजन यावर चर्चा

  • आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज मोठी घोषणा केली. मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत. उपोषणाच्या १५ व्या दिवशी मनोज जरांगे यांनी मुंबईला जायचं फायनल झालं असल्याचे सांगितले. आज अंतरवाली सराटीमध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबईला कसं जायचं?, मार्ग कोणता असेल?, आझाद मैदानापर्यंत पोहचण्यासाठी मुक्काम कुठे आणि कसा करायचा? यावर चर्चा झाली. ही बैठक संपल्यानंतर मनोज जरांगेंनी मराठा बांधवांशी संवाद साधत सर्वांना मुंबईत येण्याचे आवाहन केले. मुंबईतल्या आझाद मैदानावरील उपोषण बेमुदत असेल अशी घोषणा त्यांनी केली.

मनोज जरांगे पाटील हे उपोषणाच्या १५ व्या दिवशी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सांगितले की, 'समाज सर्वांचा बाप असतो. मराठ्यांनी पायाखाली चिरडलं तरी ते चिरडून जातील. जो मार्ग असेल तो असेल, कुठूनही गेलं तरी जायचं तिथेच आहे. समाजासाठी लढाई आहे कुणाला खुन्नस द्यायची नाही. आपल्याला मुंबईत जायचं आणि जिंकून यायचं आहे. कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईत जाऊन जिंकून यायचे आहे. मराठा आंदोलकांनी होकार दिल्यानंतर मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. माझा समाज बलशाली आहे. समाजाच्या प्रतिष्ठेसाठी गर्दी होते. आमचा समाज ताकदवान आहे. इथून गाड्या घेऊन निघालो तर २-३ दिवस लागतील.'

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून मुंबईत जाण्याची घोषणा; ५ दिवसांत आझाद मैदानावर पोहचणार; कसा असेल मार्ग?
Manoj Jarange : 'जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर...'; दिपकेंच्या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबईत जाताना मुक्काम कुठे असेल हे जरांगेंनी मराठा बांधवांना सांगितले. ते म्हणाले, 'पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे असेल. दुसरा मुक्काम अहिल्यानगरमधील श्रीगोंधा येथे असेल. तिसरा मुक्काम पुण्यातील हडपसर येथे असेल. चौथा मुक्काम रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असेल. त्यानंतर पाचव्या दिवशी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहोत. पाचव्या दिवशी सकाळी १० वाजता आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहोत.'

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून मुंबईत जाण्याची घोषणा; ५ दिवसांत आझाद मैदानावर पोहचणार; कसा असेल मार्ग?
Manoj Jarange: ठरलं! जरांगे मुंबईत येण्यावर ठाम, उद्या ठरणार मोर्चाचा मार्ग अन् ठिकाण

मनोज जरांगेंनी सांगितले की 'मी तुमच्या हितासाठी निर्णय घेतो. बारीक विचार कारयाचा असतो. मुक्कामाच्या ठिकाणच्या सर्व मराठा समाजाने आजपासून कामाला लागायचे आहे. सर्व मराठा बांधवांनी तयारीला लागावे. जे मराठा बांधव मुंबईला चालले आहेत ते आपल्या मुलाबाळांसाठी चालले आहेत. जे मुंबईला येऊ शकणार नाही त्यांनी आंदोलनाच्या मार्गावर आशीर्वाद देण्यासाठी यावे. एक दिवस जातीसाठी सर्वांनी द्यायचा आहे. हातातलं काम टाका आणि रस्त्यावर यायचे आहे.'

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून मुंबईत जाण्याची घोषणा; ५ दिवसांत आझाद मैदानावर पोहचणार; कसा असेल मार्ग?
Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना आवाहन केले की, ' सगळ्यांनी एकाच मार्गाने जायचे आहे. ज्या मराठ्यांकडे गाड्या आहेत पण त्यांना मुंबईत येता येत नाही त्यांनी गाड्यांनी आम्हाला मुंबईला सोडायचे आणि परत यायचे आहे. शांततेचा मार्ग कुणीही सोडायचा नाही. मुंबईत जाताना शब्द पाळायचा. ओव्हरटेक करायचे नाही. आझाद मैदानावरील उपोषण बेमुदत असणार आहे. सर्वांनी सहकुटुंब यायचं आहे. सर्वांनी एकत्र सोबत जायचे आहे. न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही. सरकारने अन्याय केला तरी न्यायदेवता आपल्याला न्याय देईल. '

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून मुंबईत जाण्याची घोषणा; ५ दिवसांत आझाद मैदानावर पोहचणार; कसा असेल मार्ग?
Manoj jarange: मनोज जरांगेंना मोठा दिलासा, हायकोर्ट म्हणाले- 'त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार'; कोर्टात नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com