Weather Update: गणपती बाप्पाच्या आगमनाआधी पावसाची हजेरी; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update: गणपती बाप्पाच्या आगमनाआधी महाराष्ट्रात पुन्हा पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, ठाणे, जळगावसह २८ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Maharashtra heavy rain forecast before Ganeshotsav
Maharashtra heavy rain forecast before GaneshotsavSaam TV
Published On

Maharashtra heavy rain forecast before Ganeshotsav : गणेशोत्सवाच्या उत्साहात आणि बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत असलेल्या नागरिकांसाठी तसेच गणेशभक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे पुढील २ ते ३ दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Maharashtra heavy rain forecast before Ganeshotsav
महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट! दीड महिना कोरडा गेला, ५ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज, IMD ने काय दिला इशारा?

मुंबई पुण्यासह राज्यात पावसाचा अंदाज:

मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका आणि उकाडा सहन करणाऱ्या नागरिकांना या पावसाने काहीसा दिलासा मिळणार आहे.

Maharashtra heavy rain forecast before Ganeshotsav
Pune Bank Scam : पुण्यात बँकेत महाघोटाळा! तब्बल ३४.७७ कोटींचा दरोडा; पोलिसांच्या कारवाईने सहकार क्षेत्रात खळबळ

कोणत्या जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता?

पालघर, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, ठाणे, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Maharashtra heavy rain forecast before Ganeshotsav
Manoj Jarange : 'जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर...'; दिपकेंच्या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ

जळगावमध्ये दीड महिन्यांनंतर दमदार पाऊस; वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित

गेल्या महिना-दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने रात्री हजेरी लावली. अवघ्या काही वेळातच या हलक्या सरींचे रूपांतर मुसळधार पावसात झाले. रात्री शहरात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसासोबतच सुसाट वारा सुटल्याने वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जाणवणाऱ्या उकाड्यापासून जळगावकरांना अखेर दिलासा मिळाला.

मात्र, या अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सुसाट वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसाच्या या पुनरागमनामुळे शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहू लागले. ऐन रात्रीच्या वेळी पावसामुळे रस्त्यांवर काही काळ पाणी साचले होते. लांबलेल्या पावसामुळे चिंतेत पडलेल्या शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर मात्र या पावसाने काही प्रमाणात का होईना, आशेचे किरण निर्माण केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com