महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट! दीड महिना कोरडा गेला, ५ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज, IMD ने काय दिला इशारा?

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात यंदा आतापर्यंत १५% पावसाची तूट नोंदवली असून ऑगस्टमध्ये तब्बल ४६% पाऊस कमी झाला. ११ ते १५ सप्टेंबरदरम्यान राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याचा IMDचा अंदाज आहे.
Maharashtra Faces Drought-Like Situation as Rainfall Deficit
Maharashtra Faces Drought-Like Situation as Rainfall DeficitSaam TV Marathi
Published On

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Maharashtra drought situation due to low rainfall : राज्यात पावसाळ्यापूर्वीच ‘एल निनो’ सक्रिय झाल्याने यंदा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. सध्याची स्थिती पाहता हवामान विभागाचा हा इशारा खरा ठरला आहे. राज्यातील काही भागांत गेल्या दीड महिन्यापासून पाऊसच पडलेला नाही; त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत राज्यात एकूण १५% तूट नोंदवली गेली आहे, तर ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल ४६% पावसाची तूट झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. सानप यांनी दिली. ते साम टीव्हीसोबत बोलत होती.

एस. डी. सानप यांनी आतापर्यंत राज्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी, तूट सांगितली. त्याशिवाय सप्टेंबर महिन्यात किती पाऊस पडेल, याबाबतही अंदाज वर्तवला आहे. या वेळी हवामान शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप म्हणाले, १ जूनपासूनची आकडेवारी पाहिल्यास राज्यात १५% तूट दिसून येते.

मराठवाडा: -३६%

विदर्भ: -२७%

कोकण आणि गोवा: -१०%

मध्य महाराष्ट्र: -३%

मध्य महाराष्ट्रात पावसाची तूट जरी -३% दिसत असली, तरी घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाल्यामुळे ही सरासरी भरून आली आहे. प्रत्यक्षात नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या पूर्वेकडील तालुक्यांमध्ये पावसाची तूट जास्त आहे.

Maharashtra Faces Drought-Like Situation as Rainfall Deficit
Manoj Jarange : मनोज जरांगेंवर ₹१,००० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, ED कडे तक्रार दाखल

ऑगस्ट महिन्यातील विभागनिहाय तूट:

ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत तब्बल ४६% पावसाची तूट नोंदवली गेली.

मराठवाडा: -६९%

विदर्भ: -५८%

कोकण व गोवा: -३३%

मध्य महाराष्ट्र: -३१%

ऑगस्ट महिन्यात बंगालच्या उपसागरात ३ ते ४ कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली होती; मात्र ती उत्तर भागात निर्माण होऊन ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि मध्य प्रदेशकडे सरकली. महाराष्ट्राला अनुकूल अशी प्रणाली सक्रिय न झाल्याने, 'एल निनो'चा प्रभाव आणि वातावरणातील प्रतिकूल बदलांमुळे राज्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले, असे सानप यांनी सांगितले.

Maharashtra Faces Drought-Like Situation as Rainfall Deficit
Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

पावसाच्या पुनरागमानाची शक्यता:

बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते वायव्य दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. ११ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या काळात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे, अशी माहिती डॉ. सानप यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com