Manoj Jarange: आंदोलन मागे घेण्यासाठी ५०० कोटींची ऑफर आली होती का? मनोज जरांगेंनी सांगितले सत्य

Manoj Jarange on Rs 500 Crore Offer: मनोज जरांगे पाटील यांनी आज साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपबाबत धक्कादायक खुलासे केले.
Manoj Jarange: आंदोलन मागे घेण्यासाठी ५०० कोटींची ऑफर आली होती का? मनोज जरांगेंनी सांगितले सत्य
Manoj JarangeSaam Tv
Published On: 
  • मनोज जरांगे पाटील यांनी साम टीव्हीच्या ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले

  • ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपमागचं सत्य जरांगेंनी सांगितले

  • देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित गंभीर आरोप त्यांनी केले

मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटींचा ऑडिओ बॉम्ब फोडून राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांनी घेतलेल्या ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ मुलाखतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले. आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांना ५०० कोटींची ऑफर आली होती का? यामागचे सत्य जरांगेंनी सांगितले.

मनोज जरांगे यांनी ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपबद्दल सांगितले की, '५०० कोटींबाबत जर कुणी बोलले तर मी त्या व्यक्तीचे तोंड फोडेल. आपल्याकडे पैशाचा विषय काढण्याचा संबंध नाही. माझ्या जवळच्याला कुणी पैसे दिले हे मला कळाले तर मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो की कुणी घेतले असेल तर माघारी द्या. देणाऱ्याने पैसे देऊ नका. मला पैसा लागत नाही, मला भेटण्यासाठी पैसा लागत नाही, प्रचार-सभेला पैसे लागत नाही, तिकीटासाठी पैसे लागत नाही, माझ्या जवळच्या एकाही व्यक्तीला पैसे देऊ नका आणि घेतला असेल तर माघारी घ्या असे मी सांगतो. मला ऐकायला मिळाले की मला ५०० कोटी मिळाले तर हे मी झाकून ठेवायचे का? मी स्वत:ला प्रामाणिक म्हणतो. जातीला मी मायबाप म्हणतो. मग मला खरं सांगितले पाहिजे. ५०० कोटी रुपये दिले की नाही? याबाबत त्यांनी हा बोलावे किंवा नाय बोलावे.'

Manoj Jarange: आंदोलन मागे घेण्यासाठी ५०० कोटींची ऑफर आली होती का? मनोज जरांगेंनी सांगितले सत्य
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांविरोधात जाणाऱ्यांना 2029ला पाडणार'; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा

मनोज जरांगे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, 'या लोकांनी माझ्याविरोधात माणसं पेरली आहेत. आता त्यांनी नवीन डाव टाकले आहेत. यात शिंदेंची आणि भाजपची माणसं आहेत. तुम्ही याच्याविरोधात आरोप करा, पैसे घेतले म्हणा, पद मागितले असे म्हणा असे त्यांना सांगितले जात आहे. माझ्यावर आरोप करा तुमचं काय होणार नाही. उलट तुम्ही म्हणाल त्याच्यावर केस होईल असे ते त्यांना सांगत आहेत. आता यांनी नवीन सांगितले आहे की, तो जिथे असेल तिथे जायचे, त्याला चिड येईल असे बोलायचे, त्याच्या गावाकडे जायचे. बीडमध्ये असेल तिथे मुद्दाम गर्दीत जायचे.'

Manoj Jarange: आंदोलन मागे घेण्यासाठी ५०० कोटींची ऑफर आली होती का? मनोज जरांगेंनी सांगितले सत्य
Manoj Jarange-Eknath Shinde: ५०० कोटींच्या आरोपावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, मनोज जरांगेंना सल्लाही दिला

रामदास कदम यांना त्या क्लिपची तारीख माहिती कशी झाली? यावर मनोज जरांगे म्हणाले की, 'त्यांच्याकडे तारीख कशी आली हे मला माहिती नाही. मी त्यांचा आदर करत होतो पण ते काहीही बोलत चालले आहेत. मी सांगतो काय? तुम्ही करता काय? माझे म्हणणे काय? शिंदेसाहेब जर तुम्ही भाजपकडून ५०० कोटी घेऊन मला दिले असेल तर मला सांगून टाका. दिले असतील तर हा म्हणा नसेल दिलं तर नाही म्हणा.'

तसंच, 'मी क्लिप समोर आणायच्या आधी ती क्लिप बाहेर कशी आली? एका वृत्त वाहिनीवर ती क्लिप मिळाली. ही क्लिप माझ्याकडे कशी आली, ती बाहेर कुणी काढली त्याचे नाव मी सांगणार नाही. कारण त्यांच्या जीवाला धोका असतो. ती ऑडिओ क्लिप एआय नाही. माझ्याविरोधात कट रचला जात आहे. शिंदेसाहेब बोलतात पैसे घेतले नाही. मग त्यांना शिंदेसाहेब आणि त्यांच्या मुलाला संपवायचे होते का?', असा सवाल जरांगेंनी केला आहे.

Manoj Jarange: आंदोलन मागे घेण्यासाठी ५०० कोटींची ऑफर आली होती का? मनोज जरांगेंनी सांगितले सत्य
Manoj Jarange: 'माझ्या नादी लागू नका, हा बॉम्ब होता, नंतर अणुबॉम्ब टाकणार'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com