एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना 500 कोटी दिले? जरांगे आरोपांचे पुरावे देणार?

Jarange Patil Allegation : दसरा मेळाव्यातून सुरु झालेला वाद आता विकोपाला जात असल्याचं दिसतंय. होय. कधीकाळी सौहार्दाचे संबंध असणाऱ्या दोन मराठा नेत्यांमध्ये आज अशी जुंपलीये की महाराष्ट्राचं लक्ष हे उद्या सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लागलंय. पाहा.
₹500 Crore Allegation: Manoj Jarange Patil To Present Evidence Against Eknath Shinde?
₹500 Crore Allegation: Manoj Jarange Patil To Present Evidence Against Eknath Shinde?saam tv
Published On: 
Summary
  • जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्याबाबत गंभीर दावा केला.

  • जरांगे पाटील २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पुरावे सादर करणार

  • नारायणगड येथील मेळाव्यातील विधानांनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात

सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष हे २२ ऑक्टोबरच्या सकाळी ११ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लागून राहिलंय. होय. ही पत्रकार परिषद घेणारेत मराठा आंदोलक मनोज जरांगे. आता मनोज जरांगे पुन्हा मोठं मराठा आंदोलन उभं करण्यासाठी पत्रकार परिषद घेतायेत का तर नाही, अजिबात नाही. मनोज जरांगे या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंकडून ५०० कोटी रुपये घेतल्याच्या कथित चर्चांचे अस्सल पुरावेच सादर करणार आहेत.

मनोज जरांगेंनी दसरा मेळाव्यात मराठा समाजाला मार्गदर्शन करतांना त्याच्यावर होणाऱ्या आरोपांच्या चर्चांबद्दल जाहिर व्यासपीठावरुन भाष्य केलं. यावेळी त्यांनी आजवर मनोज जरांगेंसोबत कायम सौहार्द जपणाऱ्या एकनाथ शिंदेंनाच सवाल केल्यानं खळबळ माजली. शिंदेंमुळेच आपली नाहक बदनामी होत असल्याचा गंभीर आरोप करत, जरांगेंनी थेट शिंदेंनाच कटघऱ्यात उभे केलं.

₹500 Crore Allegation: Manoj Jarange Patil To Present Evidence Against Eknath Shinde?
जरांगे-पाटील संधी साधूपणा करताय; भरत गोगावलेंचा टोला,शिंदेंवरील 500 कोटींच्या आरोपांवरून राजकारण तापलं!

थेट दसरा मेळाव्यातून शिंदेंवर इतका मोठा आरोप करुनही शिंदेंनी दसरा मेळाव्याच्या आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात यावर प्रतिउत्तर दिलेलं नाही. पण त्यांच्या शिलेदारांनी मात्र या मुद्द्यावरून जरांगेंवर जोरदार पलटवार केला!

याच शिंदेंसेनेच्या मंत्र्यांनी दिलेल्या चॅलेंजला मनोज जरांगेंनी स्विकारलं. आणि आता जरांगेंनी थेट गुरुवारी सकाळी ११ वाजता पुरावे देण्याचं जाहिर केलं. त्यामुळे ते काय पुरावे देतात हे पाहणं महत्वाचं आहेच पण या आरोपांची ईडी चौकशी करा अशी मागणी ठाकरे सेनेनं करत तापलेल्या आगीत तेल ओतलंय.

₹500 Crore Allegation: Manoj Jarange Patil To Present Evidence Against Eknath Shinde?
उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; कोर्टानं दिला फक्त 8 आठवड्यांचा वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?

मनोज जरांगे नेमके कोणते पुरावे समोर आणतात, ते कळेलच. या आरोपांमुळे सध्या सत्ताधारी आणि आंदोलक यांच्यातील संघर्ष एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलाय. कारण आरोप करणारे मनोज जरांगे हे मराठा समाजातील नेते आणि आरोप ज्यांच्यावर आहेत तेही मराठा समाजाचे नेतेच. त्यामुळे या आरोप प्रत्यारोपांनी राजकारण जरी तापलं असलं तरी केवळ वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांनी मराठा आंदोलनाची दिशा बदलू नये इतकंच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com