मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपनंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू झालाय. यावरच शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. मनोज जरांगे आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आता मनोज जरांगे एकनाथ शिंदेंच्या मुळावर उठलेत, भाजपमधून एकनाथ शिंदेंना संपवण्याचा विडा कोणी उचललाय असा सवाल रामदास कदम यांनी केला. यावरच आता भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिले. सत्तेत एकत्र असताना प्रमुख सहकारी पक्षावर आरोप करणं योग्य नसल्याचं सांगत दरेकर यांनी रामदास कदम यांना सुनावलं.
रामदास कदम हे ज्येष्ठ आणि जबाबदार नेते आहेत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्यं करणं चुकीचं असल्याचं दरेकर म्हणाले. सत्तेत एकत्र असताना अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही. रामदास कदम यांच्या कुटुंबातील एक मुलगा गृहराज्यमंत्री, तर दुसरा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांनी बोलताना जबाबदारीचं भान ठेवायला हवं, असं दरेकर यांनी म्हटलं.
जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली जात असेल, तर त्याला आमचा विरोध नाही. मात्र, चौकशी होण्यापूर्वीच भाजपला दोष देणं चुकीचं आहे. आम्हालाही आमच्या नेत्यांचा आदर आहे, असं दरेकर यांनी स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी आणि त्यांच्याविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी पडद्यामागून कोण ताकद देत होतं, असा सवाल त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी कोण ताकद देत होतं? त्यांच्यावर आरोप होत होते, त्यामागे काही षडयंत्र होतं का? असे प्रश्न उपस्थित करत दरेकर यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं. जर भाजपला या प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात असेल, तर इतर बाबीही समोर आणाव्या लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.