धक्कादायक! मध्यरात्री दबक्या पावलाने घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून केला ३४ वर्षीय महिलेवर अत्याचार
Latur Crime :Saam tv

Latur Crime : धक्कादायक! मध्यरात्री दबक्या पावलाने घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून ३४ वर्षीय महिलेवर केला अत्याचार

Latur Crime News : लातूरमध्ये ३४ वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी महिलेवर अत्याचार करून पळ काढला आहे. ३४ वर्षीय महिलेवर झालेल्या अत्याचारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
Published on

संदीप भोसले, साम टीव्ही प्रतिनिधी

लातूर : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना थांबण्याच्या नावच घेईना. राज्यात दर दिवसाला महिला अत्याचाराच्या घटना घडू लागल्या आहेत. महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने घडू लागल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीस आला आहे. वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांमुळे महिला सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याचदरम्यान, महाराष्ट्रातील लातूरमधून महिला अत्याचाराची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

लातूरमध्ये चाकूचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. लातूरच्या कासार-शिरसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. लातूरच्या निलंगामध्ये खळबळ उडाली आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यातील कासार-शिरसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३४ वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

धक्कादायक! मध्यरात्री दबक्या पावलाने घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून केला ३४ वर्षीय महिलेवर अत्याचार
Latur Crime : सैतानी कृत्य! 70 वर्षीय महिलेवर अत्याचार करून हत्या, लातूरमधील संतापजनक घटना

या महिलेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याचा प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे. महिलेवर अत्याचार करून आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असल्याने आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथके रवाना झाले, असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे

नेमकं काय घडलं?

महिला तिच्या राहत्या घरी राहिली होती. महिला घरात झोपल्याचे पाहून आरोपीने घरात शिरला. घरात शिरलेल्या आरोपीने महिलेला चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर आरोपीने महिलेवचक अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने कोणाला सांगिलतल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. या अत्याचारानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली. महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपीच्या गुन्हा दाखल केला आहे.

धक्कादायक! मध्यरात्री दबक्या पावलाने घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून केला ३४ वर्षीय महिलेवर अत्याचार
Pune Crime: भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला, पुण्यात नेमकं काय घडलं?

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसे गावात एक धक्कादायक घडली आहे. या गावातील नराधम पित्याने आपल्याच गतिमंद मुलीस मारहाण करून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक प्रकार केला आहे. पीडितेच्या आईने नाशिक रोड पोलीस ठाण्यात वडिलांविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या घटनेने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. चिमुकलींवर होणारे अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र सध्या समोर येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com