Latur Heavy Rain
Latur Heavy RainSaam tv

Latur Heavy Rain : लातूर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; काढणीला आलेल्या उडीद, मुगाचे नुकसान

Latur News : मागील आठवडाभरापूर्वी लातूर जिल्ह्यात पाऊस सुसु होता. मात्र मध्यंतरी पावसाने विश्रांती दिली होती. या विश्रांतीनंतर लातूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे.
Published on

संदीप भोसले 
लातूर
: काही दिवसांपासून प[पावसाने विश्रांती घेतली होती. यानंतर लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात रात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून प्रामुख्याने काढणीला आलेला मूग, उडीद हे पिक भुईसपाट झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकऱ्याचे डोळे पाणावले आहेत. 

Latur Heavy Rain
Heart Attack Death : काँग्रेस नेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू, पत्रकारांसोबत बोलतानाच कोसळले; थरारक VIDEO समोर

मागील आठवडाभरापूर्वी लातूर (Latur) जिल्ह्यात पाऊस सुसु होता. मात्र मध्यंतरी पावसाने विश्रांती दिली होती. या विश्रांतीनंतर लातूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेती (Heavy Rain) पिकांचे प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. यात जळकोट तालुक्यातील होकर्ना, वांजरवाडा, उमरदरा, शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने काढणीला आलेल्या मूग, उडीद या शेती पिकाचं मोठं नुकसान झाले आहे. 

Latur Heavy Rain
Accident News : बागेश्वर धामला निघालेल्या भाविकांच्या रिक्षाला भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, ७ गंभीर जखमी

ढगफुटी सदृश्य पावसामुळे अक्षरशः शेती पिकं वाहून गेल्याचे चित्र आहे. ऊस, सोयाबीन, कापूस, मूग ही पिके पावसाने जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. दरम्यान आता तात्काळ नुकसानीची भरपाई मिळावी; अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com