सचिन कदम, साम टीव्ही
रायगड: राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद आता चिघळण्याची चिन्हे आहेत.शिवसेनेच्या नेत्यांनी सुनील तटकरे यांच्याविरोधात वरिष्ठाकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक कामांमध्ये हस्तक्षेप करणे, तसेच अधिकाऱ्यांना कामावरून धमकावणे, असे आरोप या तक्रारीत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे.
सुनील तटकरे हा विश्वासघातकी माणूस असून केसाने गळा कापणारा व्यक्ती आहे. मला संपवण्याचा डाव आखला जात आहे. मला जीवे मारण्याची सुपारी सुनील तटकरे यांनी दिली होती. असा खळबळजनक दावा महेंद्र थोरवे यांनी केला आहे. तसेच राजकारणात आपण घाबणारे नसून जर तटकरे यांच्याकडून अशा प्रकारे राजकारण केले जात असेल तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही त्यांनी दिला.
अनिल तटकरे यांना आमदार करण्यासाठी मदत केल्याचे थोरवे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे याचा आदेश होता म्हणून आम्ही अनिकेत तटकरे यांना मदत केली. मात्र आता त्यांची भूमिका बदलल्यासारखी वाटत आहे. त्यावेळी आम्ही मोठी चूक केली. जर त्यावेळी आम्ही त्यांच्या विरोधात भूमिका घेतली असती, तर त्यांचा मुलगा आमदार झालाच नसता, असे विधानही थोरवे यांनी केले.
आपापसांत भांडणे लावण्याचे काम सुनील तटकरे करतात, असा आरोप करत थोरवे यांनी केला. दरम्यान, महेंद्र थोरवे यांनी केलेल्या या गंभीर आरोपांवर सुनील तटकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.