

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या क्लिपची चर्चा
देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा छडा लावावा, अशी जरांगे यांची भूमिका
प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं आहे.
आता कोणालाही पळवाटा शोधता येणार नाहीत, हा प्रकार म्हणजे कोणतंही AI नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छडा लावावा. त्यांनी स्वत:ला सिद्ध करावं अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटीच्या क्लिपचा खोलात जाऊन तपास केला जावा अशी मागणी जरांगेंनी केलीय. मनोज जरांगे पाटील यांनी आज या क्लिप प्रकरणात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी क्लिपमधील लोक आहेत. त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे, याचा शोध घेतला गेला पाहिजे अशी मागणी केलीय.
प्रसारित केलेल्या कथित ५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपवरून राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झालाय. दरम्यान याप्रकरणाचा तपास एसआयटीकडून केला जाणार आहे. यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आलीय. त्यानंतर जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या क्लिपमध्ये बोलणारे लोक नेमके कोण आहेत? ही यंत्रणा कोणाची आणि त्यांच्या पाठीशी कोणाचा हात आहे? याचा छडा लावावा अशी मगाणी केली.
जर मुख्यमंत्री फडणवीसांनी लावला नाही, तर या संपूर्ण प्रकरणात फडणवीसांचाही हात होता का, असा संशय जनतेच्या मनात निर्माण होईल. यामुळे त्यांनी जगाला दाखवून द्यावं ते मराठा, ओबीसी, शेतकरी विरोधी नाहीत. शिवसेना असो की, राष्ट्रवादी असो, ते कोणाच्या विरोधात नाही दाखवून द्यावं. त्यांनी स्वत: ला सिद्ध करावं असंही जरांगे यावेळी म्हणाले.
माझ्याकडे कोणतीही यंत्रणा नाहीये. तुम्ही सत्ताधाऱ्यांचे प्रवक्ते असलात, तरी समाजात समोर आलेले सत्य स्वीकारण्याची हिंमत दाखवली पाहिजे. यात भाजपमधीलच लोक सामील होते, मात्र याची कल्पना फडणवीसांना होती की नाही? असा सवाल मनोज जरांगे पत्रकार परिषदेत केलाय.
"हे एका टोळीचे किंवा व्यक्तीचे काम नाही, तर खूप मोठे नेटवर्क आहे. पैसे दिले तरी संबंधित लोक आता गप्प बसणार नाहीत. ती महिला बळजबरीने आरोप करत आहे, असे कसे म्हणता येईल? ती खोटे आरोप कशासाठी करेल?, असा सवालही जरांगे यांनी केलाय.
'या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करा किंवा इतर कोणत्याही तपास यंत्रणेकडून करा. पण ही चौकशी कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता पारदर्शकपणे झाली पाहिजे. मराठीत AI चा वापर करून खोटे पुरावे सिद्ध करण्याइतके आम्ही सक्षम नाही, मात्र मी आता या प्रकरणाचा मुळापर्यंत शोध घेणार असून या लोकांच्या मागे हात धुऊन लागणार असा इशाराही दिला जरांगेंनी दिलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.