मुलीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून बापानेच आवळला गळा; हत्येनंतर उरकले अंत्यसंस्कार, गुप्त माहितीमुळे बिंग फुटले

crime news : पित्यानेच आपल्या ३५ वर्षीय विवाहित मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येनंतर नातेवाईकांनी घाईघाईत मृतदेहावर अंत्यसंस्कार करून अस्थीविसर्जनही उरकून घेतले.
Father kills daughter due to illicit affair and secretly performs last rites
Father kills daughter due to illicit affair and secretly performs last ritessaam tv
Published On: 

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे एका पित्यानेच आपल्या ३५ वर्षीय विवाहित मुलीचा गळा आवळून हत्या केली. मुलीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून आणि समाजात बदनामी झाल्याच्या रागातून वडिलांनीच हे टोकाचे पाऊल उचलले. विशेष म्हणजे, हत्येनंतर मृतदेह मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले आणि अस्थीविसर्जनही उरकण्यात आले. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे या खळबळजनक प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

आरोपीची ३५ वर्षीय विवाहित मुलगी मागील काही महिन्यांपासून माहेरीच राहत होती. २०१६ मध्ये तिचा विवाह हिंगोली जिल्ह्यातील तरुणाशी झाला होता आणि त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र, मागील एक-दीड वर्षापासून तिचं तिच्या पतीच्या मित्रासोबत प्रेमसंबंध होते याची कल्पना तिच्या वडीलांना मिळाली. वडिलांनी वारंवार समजूत काढूनही ती ऐकत नव्हती. तरीही दसऱ्याच्या काही दिवस आधी ती आपल्या प्रियकराला जाऊन भेटली होती.

Father kills daughter due to illicit affair and secretly performs last rites
Pune : पत्नीला खाऊ घातले ब्लेडचे तुकडे, पतीला न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

हत्यानंतर रचला हृदयविकाराचा बनाव

समाजात आपली बदनामी झाल्याच्या रागातून आरोपीने २० ऑक्टोबरच्या रात्री शेल्याने गळा आवळून मुलीची हत्या केली. त्यानंतर मुलगी हृदयविकाराच्या झटक्याने मृत पावल्याचे नातेवाईकांना भासवले. घाईघाईने शेतात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले, तर दुसऱ्या दिवशी मुलगा आणि मामाच्या मदतीने जऊळका परिसरातील काटेपूर्णा नदीत अस्थीविसर्जनही केले.

Father kills daughter due to illicit affair and secretly performs last rites
क्लिपमध्ये बोलणारे लोक नेमके कोण? यंत्रणा कोणाची, त्यांच्या पाठीशी कोणाचा हात? छडा लावा जरांगेंची मागणी

पोलिसांच्या कारवाईने बिंग फुटले

या प्रकरणाची गुप्त माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत मृत मुलीचे वडीलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी हत्येची कबुली दिली. मृताच्या आईच्या तक्रारीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काटेपूर्णा नदीतून विसर्जित केलेल्या अस्थी शोधून काढल्या असून, फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पुढील कायदेशीर तपास शिरपूर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com