१३ आखाडे, शेतकरी मुलींची लग्नं अन् पक्की घरं! एकनाथ शिंदेंच्या मोठ्या घोषणा

Eknath Shinde Speech At Trimbakeshwar Sant Sammelan: त्र्यंबकेश्वर येथील संत संमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असल्याचे सांगितले. १३ आखाड्यांतील संतांच्या भोजनाची जबाबदारी शिवसेना घेणार असून शेतकरी मुलींची लग्ने आणि कुंभमेळ्यातील बाधितांच्या पुनर्वसनाबाबतही महत्त्वाच्या घोषणा केल्या.
Nashik Simhastha Kumbh Mela development and infrastructure updates
Nashik Simhastha Kumbh Mela development and infrastructure updatessaam tv
Published On: 

राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ आहे. संतांच्या पायाशी नतमस्तक होऊन राज्यकारभार चालवणे हाच आमचा संस्कार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे आयोजित संत संमेलनात ते बोलत होते. भगवान त्र्यंबकेश्वर आणि गोदामाईच्या चरणी वंदन करून त्यांनी देशभरातून आलेल्या संत-महंतांना अभिवादन केले. साधू-संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आज संतांच्या माध्यमातून खरी दिवाळी साजरी होत आहे. हे केवळ राजकीय किंवा सामाजिक संमेलन नसून आध्यात्मिक ऊर्जेचा उत्सव आहे, असे शिंदे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी राजकारण हे समाजकारण, राष्ट्रसेवा आणि राष्ट्ररक्षणासाठी करण्याचा संस्कार दिला. राजसत्ता हातात असली तरी अध्यात्मिक व धर्मसत्ता मोठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Nashik Simhastha Kumbh Mela development and infrastructure updates
'हा तर शिंदे-फडणवीसांच्या विरोधातील गेम प्लॅन, दिल्लीतून हात असल्याचा संशय'; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि समर्थ रामदास यांच्या संस्कारांनी महाराष्ट्र घडला. संतांनी भक्तीसोबत माणुसकी, समता आणि समाजसेवा शिकवली. “जे का रंजले गांजले...” या संत तुकारामांच्या विचाराचा दाखला देत गरजूंची सेवा हाच खरा धर्म असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Nashik Simhastha Kumbh Mela development and infrastructure updates
Sanjay Raut: 500 कोटी कोणी दिले आणि कुठे गेले? संजय राऊतांनी अमित शाहांना लिहिलं पत्र, थेट ED ची मागणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी शिवसेना मदत करणार, अशी घोषणा त्यांनी केली. कुंभमेळा हा केवळ श्रद्धेचा सोहळा नसून पर्यटन, व्यापार, रोजगार, पायाभूत सुविधा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा महोत्सव असल्याचे त्यांनी सांगितले. १३ आखाड्यांतील संत-महंत आणि साधूंच्या भोजनाची व्यवस्था शिवसेनेच्या वतीने केली जाणार असल्याचेही शिंदे यांनी जाहीर केले. “संतांची सेवा करणे हे आमचे भाग्य आहे,” असे ते म्हणाले.

Nashik Simhastha Kumbh Mela development and infrastructure updates
शिवसेनेच्या निकालाची तारीख ठरली? सर्वोच्च न्यायालयात मोठी घडामोड!

कुंभाच्या कामांमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांना पक्की घरे देऊन पुनर्वसन केले जाईल; कुणावरही अन्याय होणार नाही. व्यापारी, दुकानदार आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास सरकार मोबदला देईल. साधुग्रामच्या भूसंपादनासंदर्भातील तक्रारीही सोडवल्या जातील. त्र्यंबकेश्वर स्टेडियमसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून निधीचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपरिषद प्रशासकीय भवनासाठी आवश्यक निधी देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. माझ्या संपूर्ण राजकीय-सामाजिक जीवनातील हा पहिलाच आणि अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. संत-महंतांचा सन्मान करण्याचे हे सौभाग्य आहे. सीएम म्हणजे कॉमन मॅन; मी कार्यकर्ता म्हणून काम केले आणि पुढेही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार, असे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या सहकार्याने सिंहस्थ यशस्वी करण्यासाठी सरकार पूर्ण ताकदीने काम करेल. आखाडे, साधू-महंत, भाविक आणि स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. “संतांच्या आशीर्वादाने हा कुंभ यशस्वी करू; कोणावरही अन्याय होऊ देणार नाही,” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com