
दिंडीत चालत असताना चक्कर येत असल्याने आणि धाप लागत असल्याने उपचार घेण्यासाठी आश्रुबा किसन सोनवणे (वय ७५) हे वारकरी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. दरम्यान त्यांना रात्री काही उपचार देण्यात आले मात्र सकाळी वैभव लोहाट नामक कर्मचाऱ्याने या वारकऱ्याला मारहाण केली अशी माहिती रूग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी आणि मारहाण झालेल्या वारकऱ्याने दिली आहे.
- नागोठणे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा-
- अर्ध्या तासाहून अधिक काळ वाहने कोंडीत अडकली
- वाहनांची वाढलेली संख्या आणि महामार्गावर पडलेले खड्डे यामुळे प्रवाशांना मनस्ताप
- वीकेंडला कोकणात आलेल्या प्रवाशांची परतीच्या प्रवासात कोंडी
हिंदी भाषेसंदर्भातील काढलेले दोन्ही जीआर रद्द - देवेंद्र फडणवीस
त्रिभाषा सूत्राबद्दल निर्णय करण्यासाठी नरेंद्र जाधव समिती
समितीचा निर्णय आल्यावरच त्रिभाषा सूत्राचा निर्णय
हिंगोलीत एका ज्येष्ठ शिवसैनिकाचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. प्रताप काळे असं या शिवसैनिकाचं नाव होतं. लहानपणापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या काळे यांनी शिवसेनेत दाखल होत आपले संपूर्ण जीवन शिवसेनेसाठी खर्ची घातलं. आज सकाळी मुंबई येथे उपचार सुरू असताना दीर्घ आजाराने प्रताप काळे यांचे निधन झाल्याची बातमी हिंगोली मध्ये समजताच सगळीकडे शोककळा पसरली.
हिंदीसक्तीच्या निर्णयाला स्थगिती मिळण्याची शक्यता
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या १५ मिनिटं चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती
हिंदी सक्तीच्या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड ज्या ग्राम पंचायतीत येते त्या ग्राम पंचायतीचे नाव छत्री निजामपूर असं आहे. या नावाला गोपीचंद पडळकर यांनी आक्षेप घेतलाय. स्वराज्याच्या राजधानी जिथं आहे त्या ग्रामपंचायतीचे नाव बदलून छत्री निजामपूर ऐवजी रायगडवाडी करावं अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. निजामाच्या खुणा इथं कशा काय आल्या असा सवाल करीत आदिलशहा, निजामाच्या खुणा पुसल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. छत्री निजामपूरचे नाव बदलून ते रायगडवाडी करावं अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
रितेश बसवंत याने स्वत:चा जीव धोक्यात टाकून आजीचे प्राण वाचवले आहे, भातसा नदीत जीव देण्यासाठी आजीने नदीत उडी मारली होती.
दुपार नंतर शहापूर तालुक्यातील सापगाव येथील भातसा नदीवरील पूला वरून एका वयोवृद्ध आजीने जीव देण्यासाठी उडी घेतली होती हे दृश्य पाहून नदीच्या दुसऱ्या बाजूच्या किनाऱ्यावर असलेल्या रितेश बसवंत यांने बघीतले क्षणाचा ही विलंब न करता भातसा नदीत उडी घेऊन आजी पर्यंत पोहोचला व आजीला बाहेर काढले प्राथमिक उपचारासाठी शहापूर येथील उप जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरी शहापूर तालुक्यात जीव वाचवणाऱ्या रितेश बसवंत यांचे कौतुक केले जात आहे
नागपूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीतील लिहीगाव येथील कुलर बनवणाऱ्या कारखान्यात झाला स्फोट...
वेल्डिंग करतांना सिलेंडरवर चिंघारी उडाल्यामुळे सिलेंडरमध्ये स्फ़ोट झाल्याचं समोर आलं...
रविवार असल्यामुळे आज कंपनीत कामगार कमी होते सुदैवाने जीवितहानी नाही..
मात्र लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला...
कामगार वेल्डिंग करीत होते त्याची चिंगारी उडल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली...
या ठिकाणी आजूबाजूच्या भागातील अग्निशमक बंब बोलावण्यात आले आहे पाण्याचा मारा केला जात आहे.. आत मध्ये असलेल्या मशिनरी मात्र जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसान झालं आहे..
राज्यातील महायुती शासनाने हिंदी भाषेची सक्ती केल्याच्या निषेधार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शासकीय परिपत्रकाची होळी करण्यात येवून शासन निर्णयाचा निषेध करण्यात आला.
शहरातील नेहरू चौकात जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत शासन निर्णयाचा निषेध करण्यात येऊन शासन परिपत्रकाची होळी करण्यात आली. महाराष्ट्र राज्याची मराठी ही मातृभाषा असून केंद्रशासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. राज्यात इयत्ता पहिली पासून मराठी भाषेतच शिक्षण दिले पाहिजे. असे असतांना राज्यातील महायुती सरकारने हिंदी भाषा सक्तीची केली असून हा निर्णय महाराष्ट्रासाठी अन्यायकारक आहे.
महाराष्ट्रात संपूर्ण देशातील नागरीक रोजगारासाठी येत असल्याने राज्य शासनाने हिंदी भाषा सक्तीची करण्याऐवजी संपूर्ण देशात मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी केंद्र शासनाला भाग पाडले आहे. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. मात्र राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्यास आमचा विरोध आहे. राज्य शासनाने ह निर्णय मागे घ्यावा अशी शिवसेना उबाठा गटा कडून करण्यात आली आहे मागणी आहे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झालेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करणार आहे. मनोज जरंगे पाटील 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. आज अंतरवाली सराटीत मराठा समाजाची राज्यव्यपी बैठक झाली.या बैठकीमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे.
हिंदी सक्तीच्या विरोधात पाच तारखेला मुंबईत राज ठाकरे यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या मोर्चासाठी नाशिकच्या मनसे कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीस मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी मराठी माणसासाठी सगळ्यांनी एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले उद्या पासून घटक पक्षांना मोर्चे साठी एकत्र घेऊन जाण्यासाठी सगळ्यांची भेट घेण्यात येणार आहे. मराठी माणसासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार आहे त्यामुळे त्यांना ताकद देण्यासाठी नाशिक मधून मोठे शक्ती प्रदर्शन होणार आहे..
ग्रामविकास मंत्री जयकुमार मोरे यांच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केली खंत. जिल्हा परिषदच्या सीईओ यांच्याकडून बैठकीच निमंत्रण नसल्याची मिटकरींकडून माहिती. मंत्री जयकुमार मोरे यांच्या आढावा बैठकीत मिटकरींनी व्यक्त केली खंत.
दरम्यान, जिल्ह्यातील 4 आमदार बैठकीला अनुपस्थित. सत्तेतील दोन आणि दोन विरोधक आमदार बैठकीला हजर का नाहीय, मिटकरींनी बैठकीत उपस्थित केला सवाल.
आज ग्रामविकास मंत्री गोरे हे अकोला जिल्हा परिषदचा आढावा घेत असताना भाजपचे पदाधिकारी आढावा बैठकीला हजर होते, त्यावर मिटकरींनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मंत्री आढावा बैठक घेत असताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना सोबत आणू नये, अशी विनंती मिटकरींनी यादरम्यान केली.
हिंदी भाषा सक्तीला विरोध तसेच भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या शेतकरी वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय. नांदेडच्या देगलूर मध्ये शिवसैनिक आणि मनसे सैनिकांनी एकत्र येत आंदोलन केलं. या आंदोलनात केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर यांचे पोस्टर देखील जाळण्यात आले. या आंदोलनात शिवसैनिक आणि मनसे सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- हिंदी सक्ती विरोधात करण्यात आले आंदोलन
- हिंदी सक्तीचा जी आर जाळून करण्यात आला निषेध
- नाशिकच्या सीबीएस परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ जळाला हिंदी सक्तीचा जी आर
- सरकारच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी
- महाराष्ट्रात हिंदी सक्ती लादू देणार नसल्याचा दिला इशारा
पावसाळी अधिवेशनाआधी मुंबईत महाविकास आघाडी सरकारची पत्रकार परिषद पार पडत आहे. या पत्रकार परिषदेत आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार देखील उपस्थित आहेत. यावेळी आदित्य ठाकरेंनी भाजप पक्षावर सडकून टीका केली. डाग अच्छे है, भाजपची ही नवीन टॅगलाईन असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर सोडलं असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.
राज्यात मराठी भाषेच्या संरक्षणासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत ५ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन करणार आहेत. या मोर्चाला आता वारकरी संप्रदायाचा देखील पाठिंबा लाभला आहे.
विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी आज पंढरपूर येथून ठाकरे बंधूंच्या या उपक्रमाला पाठिंबा जाहीर केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता असून तिच्या रक्षणासाठी कोणतीही हालचाल आवश्यक असल्यास वारकरी संप्रदाय सदैव पुढे राहील.
महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केल्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला आणि मनमाड येथे शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने करत हिंदी सक्तीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
येवला शहरातील विंचूर चौफुलीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारच्या जीआरची होळी केली. महाराष्ट्रात मराठी ही राज्यभाषा असून ती अनिवार्य असताना, पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय मराठी भाषेच्या अस्तित्वावर घाला असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारीतील दुसऱ्या अश्व रिंगण सोहळ्यात एक आगळीवेगळी घटना पाहायला मिळाली. रिंगणातील पारंपरिक धावण्यात यंदा पोलीस बांधवांनीही सहभाग घेत वारकऱ्यांची मने जिंकली.
वारीच्या संपूर्ण मार्गावर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी पार पाडणारे पोलीस, यंदा भक्तीच्या धावण्यातही सहभागी झाले. वारकरी, विनेकरी, झेंडेकरी यांच्यासोबत रिंगणात धावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे दृश्य हे भक्तिभाव आणि सामाजिक समरसतेचे प्रतीक ठरले.
वारकरी संप्रदायात रिंगण हे केवळ परंपरा नाही तर ती एक अध्यात्मिक शिस्त आणि भक्तीचा आविष्कार असतो. या परंपरेत यंदा बंदोबस्तात असलेल्या पोलीस बांधवांना दिले गेलेले स्थान म्हणजे सेवा आणि श्रद्धेचा सुंदर संगम म्हणावा लागेल.इंदापुरात झालेल्या रिंगणात पोलिसांची ही सहभागिताही वारीच्या इतिहासात एक प्रेरणादायी क्षण ठरला.
पुरोगामी अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात भानामतीचे प्रकार वारंवार उघड
कोल्हापूर शहरातील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग या नामवंत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष आणि संचालक यांच्यावर भानामती करण्याचा प्रकार
संस्थेचे अध्यक्ष आणि संचालक यांच्यावर वडकशिवाले इथल्या स्मशान भूमीमध्ये भानामती करण्याचा प्रकार
संस्थेचे अध्यक्ष आणि संचालकांच्या फोटोवर कुंकू, हळद, लिंबू आणि टाचण्या मारून करणी करण्याचा प्रयत्न झाला उघड
परभणी शहरांमध्ये मोकाट जनावरांचा अक्षरशः हैदोस पाहायला मिळत आहे ठीक ठिकाणी हे मोकाट जनावर रस्ता अडवताना दिसत आहे तर दुसरीकडे शहरातील गजानन नगर भागामध्ये एका कठाळ्याने २ जणांना धडक देवुन गंभीर जखमी केले आहे. जवळपास २ तास हा कठाळ्या या भागात धुद्घुस घालत होता विद्यार्थी,ये जा करणारी वाहन यांच्या मागे धावून जात धडक मारत होता. एक वृद्ध नागरिक या ठिकाणाहून जात असताना अचानक येवून या कठाळ्याने त्यांना धडक मारली ते खाली पडले त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.ha प्रकार सीसीटिव्ही त कैद झाला आहे.परभणी शहरातील कुठले रस्त्यांवर गेले तर हजारो मोकाट जनावर हे ठाण मांडून बसलेले दिसून येतात या जनावरांकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे हे जनावर नागरिकांच्या जीवावर उठत आहेत.
साताऱ्यात शिंदे शिवसेनेच्या वतीने पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.यावेळी जिल्ह्यातील सर्व जिल्हा प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मेळाव्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याच बरोबर पक्षाची सदस्य संख्या वाढवणे अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
वनविभागाच्या एन्ट्री पॉईंटवर पैसे देण्यासंदर्भात काही पर्यटकांनी हुज्जत घातल्याने वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा...
रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांची चिखलदरा जाण्यासाठी मोठी गर्दी..
सध्या पावसामुळे चिखलदऱ्याच सौंदर्य फुलल आहे त्यामुळे पर्यटक चिखलदाराला जात आहे..
भरतशेठ गोगावले यांनी नारायण राणेंबद्दल केलेले ते वक्तव्य खर आणि अत्यंत योग्य आहे कारण नारायण राणेंनी संघटना अशाच पद्धतीने वाढवली असा गंभीर आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. भरत गोगावले काल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सिंधुदुर्गात आले होते. त्यांना माझा सवाल आहे, नारायण राणेंनी मर्डर, मारामाऱ्या करून पक्ष वाढवला तसच तुम्ही सुद्धा विरोधी पक्षांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना मारामारी, खून, दडपशाही करून तुमचा पक्ष वाढवण्याचे संकेत देण्यासाठी आला होता का असा प्रश्न माझा भरतशेठ गोगावलेंना आहे असही वैभव नाईक म्हणालेत. नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत. अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, भानगडी केल्या, मारामारी केल्या, मर्डर सगळं केल. अस वक्तव्य मंत्री भरतशेठ गोगावले यांनी कुडाळ येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात केल होत त्या वक्तव्यावरून वैभव नाईक यांनी नारायण राणेंसह भरतशेठ गोगावले यांच्यावर टीका केली आहे.
मराठा आरक्षणासाठी सरकार हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या तयारीत तर दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील आज आंतरवेली सराटी येथे महत्त्वाची बैठक घेणार आहेत.या बैठकीसाठी बीडमधून असंख्य मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघाले आहेत.
"मराठवाडा महाराष्ट्रात सामील होण्यापूर्वी निजामाच्या काळात आरक्षण होतं, आता पुन्हा तेच हक्क मिळाले पाहिजेत"… अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेलं.सरकारकडून हैदराबाद गॅझेट लागू करण्याची शक्यता आणि मराठा समाजाची वाढती एकजूट पाहता, आरक्षणाच्या लढ्याला नवे वळण मिळण्याची चिन्हं स्पष्ट होतायत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री २ वाजता पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका महापालिकेच्या शाळेच्या समोर घडली. रात्री २ वाजता तीन तरुण हे एका मोटारसायकल वरून आले. पूर्वीच्या वादातून त्यांना एका व्यक्तीवर हल्ला करायचा होता.
लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत दोन मध्ये धुंद तरुणांमध्ये बाचाबाची झाली.. या बाचाबाचीचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले, तर यात एक तरुण दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात दगडाने मारत जीवे मारण्याचा प्रयत्न करत असताना दिसतो आहे.. लातूरच्या एमआयडीसी रोड परिसरातील ही घटना आहे.
बोला अण्णा,बोला ताई अशा प्रकारचे फ्लेक्स पुण्यात झळकले
भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर स्वतःच्या कार्यालयीन उपयोगासाठी वीज चोरी केल्याचा आरोप केला जात आहे
त्यामुळे काँग्रेसने महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन देखील छेडले होते
त्यानंतर आता काँग्रेसकडून शहरात फ्लेक्स बाजी करत धीरज घाटेंवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न विचारला जात आहे
हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुढाकार घेत 5 जुलै रोजी मुंबई येथे मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात मराठी माणसाने सहभागी होण्याचे आवाहन देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.5 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चा शिवसेना ठाकरे गट देखील सहभागी होणार आहे.अनेक वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू या मोर्चाच्या माध्यमातून एकत्र येणार असल्याने राज्यभरातील शिवसैनिक आणि मनसे सैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाला आहे. नांदेड शहरात मराठीसाठी ठाकरे ब्रँड अशा आशयाचे बॅनर शिवसेना आणि मनसे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जागोजागी लावले आहेत.हे बॅनर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरच्या माध्यमातून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात भव्य आक्रोश मोर्चा, या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यात 26 जूनला झालेल्या मुसळधार पावसामुळ अनेक नदी नाल्यांना मोठा पूर आला होता, यात शेतीच नुकसान झालं असताना मालेगाव तालुक्याच्या रेगाव शेतशिवारात बांधलेली विहीर खचल्याने शेतकऱ्याच मोठ नुकसान झालं आहे, पिकांसोबत विहिरीच नुकसान झाल्याने शेतकऱ्यांला दुहेरी नुकसानीचा फटका बसला आहे. झालेल्या या नुकसानीची दखल शासनाने गांभीर्याने घेवुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांने केलीये.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूरात मोठ्या भक्तिभावात दाखल झाली. पालखी आगमनानंतर तिसऱ्या रिंगणसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रिंगणाच्या निमित्ताने वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, विठूनामाच्या घोषात भक्तिरसात न्हालेली वारी अनुभवली.
भुसावळ येथील प्राचिन बड़ा हनुमान मंदिर येथे विश्व कल्याणा साठी मागील 74 आठवडे पासून सामूहिक हनुमान चालीसा पाठ उपक्रम निरंतर सुरू असून आज 75 वा सप्ताह आंबे महोत्सव म्हणुन साजरा करण्यात आला शेकडो भक्तांच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालीसा पठण करून हनुमंताला 151 किलो आंब्याचे नैवेद्य दाखवुन आंबे प्रसाद म्हणुन उपस्थित सर्व भक्तांना वितरित करण्यात आले आहे
भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात शेतकरी विकास पॅनलचे नेते दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी यांना पराभूत व्हावे लागले. भंडारा तालुका गटातून त्यांचा अवघ्या दोन मतांना पराभव झाला. शेतकरी पॅनलेचे हितेश सेलोकर यांनी त्यांच्यावर मात केली.संपूर्ण जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या या दूध संघाला मतदारानी दिलेला कौल चकीत करणारा ठरला आहे. कुण्याही एका गटाला बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेसाठी एका संचालकाची गरज आहे.रामलाल चौधरी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने शेतकरी विकास पॅनल मैदानात उतरवले होते, त्यांना खासदार डॉ. प्रशांत पडोळे आणि आमदार नाना पटोले यांची साथ होती. शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे देखील त्यांच्या गटात सहभागी झाले होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत विलास काटेखाये यांच्या नेतृत्त्वातील सहकार पॅनलला आमदार डॉ. परिणय फुके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांची साथ होती.
धाराशिव जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली. पाऊस लांबल्याने सोयाबीनची पिक विमाना टाकायला सुरुवात झाली. त्यामुळे पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. जिथे पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी स्पिंकलरच्या सहाय्याने पिकाला पाणी दिले जात आहे. तरीही पाऊस लांबल्याने उत्पादनात घट होणार आहे. सर्वत्र स्पिंकलरने पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे
केदार जाधव यांनी काही दिवसांपूर्वी भाजप मध्ये केला होता प्रवेश
बारामती मधील क्रिकेट ग्राउंड च्या विषयाबाबत चर्चा करण्यासाठी केदार जाधव यांनी घेतली अजित पवारांची भेट
बारामती मधील माळेगांव साखर कारखान्यात यश मिळाल्याबद्दल अजित पवार यांचं अभिनंदन करण्यासाठी आलो असल्याची केदार जाधव यांनी दिली माहिती
मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 55 टक्के भरले असून कासरसाई धरण 100% भरलेले आहे. कासरसई धरणाच्या सांडव्यावरून 340 क्लासेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मावळ तालुक्यामध्ये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मावळ तालुक्यातील धरणांच्या पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सांगलीच्या आष्टा येथे भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका वानराचा मृत्यू झाला आहे.शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुरू असून अनेक नागरिकांना देखील भटक्या कुत्र्यांकडून जखमी करण्याचे प्रकार घडले असताना, आता भटक्या कुत्र्यांकडून एका वानराला लक्ष करण्यात आला आहे,आष्टा शहरातील शिंदे मळा येथे एका भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामध्ये वनराचा मृत्यू झाला आहे,या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी वानरावर विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. त्याचबरोबर आष्टा नगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा,अशी मागणी देखील करण्यात येत आहे.
PWD च्या अधिकार्यावर नाराजी व्यक्त करत पायऱ्यावर लावलेल्या ग्रेनाईटमध्ये पाणी मुरत नाही
अस का झाल त्याची माहिती मला पाहिजे, अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं
पावसामुळे सारथी संस्थेतील पायऱ्यावर पाणी साचले आहे
त्यामुळे अजित पवार यांच्या पाहणीत दिसल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे
अजित पवारांनी PWD अधिकार्याकडून तातडीन मागितली माहिती
- ठाकरे सेनेचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे आज 8 माजी नगरसेवकांसह करणार शिंदेच्या सेनेत प्रवेश
- आज ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होणार जाहीर प्रवेश
- प्रवेशासाठी थोड्याच वेळात नाशिकहून शेकडो वाहनांचा ताफा शक्तिप्रदर्शन करत ठाण्याकडे होणार रवाना
- विलास शिंदे सह 8 माजी नगरसेवक,12 जिल्हा परिषद सदस्य,40 हून अधिक सरपंच,जिल्हा बँक,बाजार समितीचे आजी माजी पदाधिकारीही करणार शिंदे गटात प्रवेश
- सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ ठाकरे गटातील मोठा चेहरा शिंदे गटात गेल्याने ठाकरें सेनेला अवघ्या 1 महिन्यात दुसरा मोठा धक्का
एस टी महामंडळाची बस चक्क तीन नट बोल्ट वर धावत असल्याचा प्रकार श्रीवर्धन बस डेपो परिसरात उघडकीस आला आहे. ही बस मुबई कडून श्रीवर्धन पर्यंत प्रवास करीत आली मात्र ही बस पुढील प्रवासासाठी म्हणजे दिघी ला निघाली असता जागरूक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने नागरिकांनी प्रवाशांनी या घटनेवर संताप व्यक्त केला तर गाडीची दुरुस्ती करून घेतली मात्र हा प्रकार उघडकीस आला नसता तर मोठा अनर्थ घडला असता या प्रकारामुळे एस टी महामंडळाकडून बसेस ची देखभाल तांत्रिक तपासणी होत नसल्याचे समोर येत आहे. तर दुर्घटना घडल्यावरच एस टी प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल या प्रकारामुळे उपस्थित होत आहे.
28 जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पाऊस बरसला
पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याचा अपवाद वगळता राज्यात मान्सूनने गाठली सरासरी
अजून दोन दिवस शिल्लक असून सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता
राज्यात जून मध्ये सरासरी 208 मिलिमीटर पाऊस पडतो मात्र त्या तुलनेत काल शनिवार पर्यंत 194 मिलिमीटर अर्थात ९३ टक्के पाऊस पडला आहे
25 ते 50 टक्के पाऊस असणाऱ्या तालुक्यांची संख्या 38 तर 75 ते 100% पाऊस 87 तालुक्यांमध्ये झाला
155 तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीच्या शंभर टक्के हजेरी लावली
पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या माणिक बागेमध्ये तीन जणांनी कोयत्याने शोरूम चे नुकसान केले .त्याचबरोबर गाड्यांची तोडफोड केली. याबाबत सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असून पोलिसांनी तीन जणांना अटक केली.
तीनही आरोपी अल्पवयीन आहेत. भाईगिरी करायची आहे या हेतूने रात्री अडीचच्या सुमारास तीन जण शोरूम जवळ आले आणि त्यांनी शोरूम फोडलं.
- नाशिकमध्ये पूर परिस्थिती ओसरण्यास सुरुवात, मात्र पाऊस सुरू झाल्यास पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवण्यात आल्यानं पाणी पातळी घटली
- सद्यस्थितीत गंगापूर धरणातून १,३६० क्यूसेक वेगानं गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग
तानाजी सावंत यांना शनिवारी दुपारी ४:३० वाजता रूबी हॉल क्लिनिक, ससून रोड येथे चक्कर येणे, उलटी होणे आणि हृदयाची धडधड वाढणे या तक्रारींमुळे दाखल करण्यात आले होते
दाखल होताच आपत्कालीन वैद्यकीय पथकाने त्यांची तत्काळ तपासणी केली व त्यानंतर अधिक तपासणी व निरीक्षणासाठी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
रत्नागिरी- राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठत रात्री दीड वाजता दुकानांना भीषण आग
आगीत सात दुकाने जळून खाक, राजेश दत्ताराम पावस्कर यांच्या इमारतीला आग
आगीवर स्थानिक ग्रामस्थ आणि राजापूर अग्निशामक दलाने मिळवलेले नियंत्रण
इमारतीमध्ये असलेले दुकान गाळ्यातील सामान आणि दुकान गाळे जळून नुकसान
ग्रामस्थांकडून खाजगी गाड्यांनी पाण्याची व्यवस्था करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न
कोणतीही जिवित हानी नाही, पण उपहारगृहा पासून फोटो स्टुडिओ पर्यत या इमारतीत होती दुकाने
यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी दहा हजार हेक्टर वर शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीची लागवड केली संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड होत असताना खुल्या बाजारात ज्वारीचे दर पडले आहेत.केंद्र शासनाने ज्वारीला 3371 रुपये क्विंटलचा हमीदर जाहीर केला आहे. तर खुल्या बाजारात बाजार समितीमध्ये ज्वारीला 1800 ते 2000 रुपये क्विंटलचा दर आहे. एका क्विंटल मागे ज्वारीला दीड हजार रुपयाचा घाटा सहन करावा लागत आहे अशात हमी केंद्रावर ज्वारीची खरेदी उद्यापर्यंतच होणार असल्याने ज्वारी उत्पादन शेतकरी अडचणीत आले आहे.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात तुळशी माळा तयार करण्याच्या कामांना वेग आला आहे. पंढरपुरातील काशी कापडी समाजातील तरुणांनी तुळशी माळा तयार करण्याचा पारंपारिक व्यवसाय जपला आहे.
पुण्याकडून मांजरसुंबा चौसाळा परिसरात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पातखंना मिळाली आणि त्यानंतर गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून पोलिसांनी सापळा लावत दोन आरोपींना मध्यरात्री ताब्यात घेतले आहे त्यांची बीडच्या जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक दाखवली आहे.
शनिवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास कुर्ला कॅम्प रस्त्यावरील पाणीपुरी हातगाडीवर काही नागरिक पाणीपुरी खात उभे होते. यावेळी अचानक भरधाव कार हातगाडीला येऊन धडकली. यात हातगाडीवर उभ्या असलेलं ३ ते ४ नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जातंय. या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं असून तो मद्यधुंद अवस्थेत होता का? याचा तपास केला जातोय.
भंडाऱ्यात आभार यात्रेच्या निमित्ताने भंडारा येथे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आणि कार्यकर्ता मेळावा झाला. यादरम्यान, शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंना टोला लगावला. 'वाघाचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही' असं वक्तव्य शिंदेंनी केले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच, उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंना टोला लगावला आहे. 'वाघाचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही', 'राजाचा मुलगा राज्य करणार नाही तर, काम करेल तोच राज्य करेल', 'काम करत राहा. चिंता करू नका, अपना भी टाईम आयेगा', अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंवर 'वाघाचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही', 'राजाचा मुलगा राज्य करणार नाही तर, काम करेल तोच राज्य करेल', 'काम करत राहा. चिंता करू नका, अपना भी टाईम आयेगा', अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंवर टीका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.