खरीपनंतर रब्बी हंगामसुद्धा संकटात; मुंबईसह निम्म्या राज्यातून मोसमी पावसाची माघार

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातून मोसमी पावसाची माघार सुरू झाली असून मुंबईसह मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांतून पाऊस परतला आहे. पावसाच्या तुटीमुळे आगामी रब्बी हंगामाबाबत चिंता व्यक्त होतेय.
Maharashtra Weather Update
Maharashtra monsoon withdrawal 2026 latest weather updatesaam tv
Published On: 
Summary
  • महाराष्ट्रातून मान्सूनची माघार 2026 ताजा हवामान अपडेट

  • मुंबईसह महाराष्ट्रातील भागातून मोसमी पावसाची माघार

  • मान्सून लवकर माघारी गेल्याने रब्बी हंगामावर परिणाम

यंदा राज्यात जून महिन्यात उशिराने दाखल झालेल्या मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सरासरी तारखेच्या दोन दिवस आधीच सुरू झाला. मोसमी पावसाने मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील काही भागातून माघार घेतल्याची घोषणा हवामान विभागाने केलीय. यामुळे खरीपसह रब्बी हंगामही संकटात येणार आहे.

रब्बी हंगाम संकटात

प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ हवामान प्रणालीमुळे यंदा महाराष्ट्रातील बहुतांश भागात खरीप हंगाम वाया गेला. आता रब्बी हंगामही अडचणीत आलाय. याचा अन्नधान्याच्या उत्पादनाला फटका बसू शकतो, असे कृषी सचिव अतिश चंद्रा यांनी सांगितलंय. आज अखेर मुंबई, पुणे, परभणी, ब्रह्मपुरीच्या उत्तरेकडील भागातून मान्सूनने माघार घेतलीय.

यामुळे पावसाअभावी खरीपातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि बाजरी, कापूस, हरभरा, गहू आणि ज्वारीलाही फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात रब्बीची ५४ लाख हेक्टरवर पेरणी होते. सर्वाधिक २१ लाख हेक्टरवर हरभरा, दहा लाख हेक्टर वर गहू, 17 लाख हेक्टर वर ज्वारी, अडीच लाख हेक्टर वर करडई आणि मक्याची पेरणी होत असते.

Maharashtra Weather Update
Maharashtra Drought: राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर

मोसमी पावसाची परतीची रेषा ब्रह्मपुरी, परभणी, बारामती आणि कोकणातील हर्णे येथून जात आहे. पुढील दोन ते तीन दिवसात उर्वरित राज्यातून मोसमी पाऊस माघारी फिरण्यास अनुकूल स्थिती असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिलीय. गेल्या दोन आठवड्यापासून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला होता. याच कालावधीत राज्यात राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाला. मागील काही दिवसांपासून राज्यात वादळी पाऊस प्रभावहीन झाला असून उकाड्यात वाढ झालीय.

Maharashtra Weather Update
Maharashtra Drought : शरद पवार यांचा दुष्काळ पाहणी दौरा, बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या

तसेच काही भागातील कमाल तापमानातही वाढ नोंदली जात असून पुढील काही दिवसात उकाड्यात आणखीन वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.दरम्यान, शनिवारी मुंबईसह निम्म्या राज्यतून पावसाने माघार घेतल्याची घोषणा हवामान विभागाने केली. राज्यातून मोसमी पाऊस माघारी फिरण्याचा सरासरी कालावधी ५ ते १० ऑक्टोबर इतका आहे. यंदा राज्यात पावसाचे प्रमाण असमान होते. संपूर्ण हंगामात राज्यात आतापर्यंत १९ टक्के इतकी पावसाची तूट असून सप्टेंबर महिन्यातील पावसाची तूट ५२ टक्के इतकी होती.

Maharashtra Weather Update
शेळीपालनाचा व्यवसाय करायचाय, पण शेड नाहीये? शासनाकडून किती मिळतं अनुदान?

आगमन उशिराने परतीचा प्रवास लवकर सुरू

राजस्थानमधून सरासरी १७ सप्टेंबर रोजी मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु होतो. यंदा मात्र, दोन दिवस उशिराने म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला वायव्य राजस्थानातून सुरुवात झाली. सध्या मोसमी पावसाने उत्तर भारताच्या बहुतांश भागांसह संपूर्ण गुजरात आणि मध्य प्रदेश बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही प्रदेशातून माघार घेतली आहे. राज्यातून सरासरी ५ ऑक्टोबरपासून पावसाच्या परतीची प्रक्रिया सुरु होते आणि १० ऑक्टोबरपर्यत राज्यातून मोसमी वारे पूर्णपणे माघारी जात असतात. यंदा मात्र दोन दिवस आधीच मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com