शेळीपालनाचा व्यवसाय करायचाय, पण शेड नाहीये? शासनाकडून किती मिळतं अनुदान?

Bharat Jadhav

केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान

शेळी पालन व्यवसायासाठी शासनाचे अनुदान देखील मिळते. शिवाय तुम्हाला शेळ्यांसाठी शेड बांधणी करायची असल्यास त्यासाठी देखील अनुदान दिले जाते. महाराष्ट्रात शेळीपालनासाठी आणि शेड बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळतं.

Maharashtra government goat farming subsidy scheme 2026

राष्ट्रीय पशुधन अभियान

या योजनेअंतर्गत शेळी-मेंढी पालन व्यवसायासाठी व शेड बांधकामासह इतर खर्चासाठी ५० टक्क्यांपर्यंत (कमाल ५० लाख रुपयांपर्यंत) भांडवली अनुदान मिळत असते.

Maharashtra government goat farming subsidy scheme 2026

राज्य सरकारची योजना

लहान युनिट्ससाठी (उदा. १० ते २० शेळ्या) शेड बांधण्यासाठी आणि शेळ्या खरेदीसाठी प्रवर्गानुसार अंदाजे ४५ हजार ते ५० हजार रुपयांपेक्षा अधिक किंवा प्रकल्प खर्चाच्या ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत मदत मिळत असते.

Maharashtra government goat farming subsidy scheme 2026

प्रवर्गानुसार अनुदान

खुला/सर्वसाधारण प्रवर्ग : ५० टक्के अनुदान

अनुसूचित जाती व जमाती/ महिला : ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान सरकारकडून मिळत असते.

Maharashtra government goat farming subsidy scheme 2026

कागदपत्रे

अर्जदार महाराष्ट्र राज्यातील असाला पाहिजे. स्वतःची जमीन (किमान १ एकर) किंवा ५ वर्षांचा भाडेकरार असले पाहिजे. आधार कार्ड, बँक पासबुक (खाते सीडेड असावे), पासपोर्ट साईज फोटो, जमिनीचा सातबारा व ८-अ असावा.

Maharashtra government goat farming subsidy scheme 2026

अर्ज कसा करावा?

महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT पोर्टल किंवा राष्ट्रीय पशुधन अभियान पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करता येतो. दरम्यान आता जिल्हानिहाय लाभार्थी संख्येनुसार अर्जप्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.

Maharashtra government goat farming subsidy scheme 2026