Maharashtra Drought : शरद पवार यांचा दुष्काळ पाहणी दौरा, बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या

Sharad Pawar On Maharashtra Drought News : पुरंदर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी शरद पवारांसमोर कर्जमाफी, रोजगार हमी आणि पिण्यासह जनावरांच्या पाण्याची मागणी केली. मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन पवारांनी दिले.

पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा पाढाच पवारांसमोर मांडला. शेती आणि शेती व्यवसायासाठी सहकारी, राष्ट्रीयीकृत तसेच नागरी सहकारी बँकांसह विविध संस्थांकडून घेतलेली कर्जे 100 टक्के माफ करावीत, अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करून गावांपासून जवळच्या परिसरातच रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. या सर्व मागण्यांबाबत आपण येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी, आर्थिक मदत आणि रोजगार हमीची कामे मिळावीत, यासाठी पवार यांनी यापूर्वीही विविध मागण्या मांडल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com