IMD Issues Orange and Yellow Alerts Across Maharashtra – Full District List : मुंबई, पुण्यासह राज्यभरात दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे. मुंबईमध्ये सकाळपासून पावसाचा जोर आणखीच वाढला आहे. मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सखल भगात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे उपनगरिय रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे १५ मिनिटे उशिराने धावत आहे. पुण्यातही सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार ते अतिमुसळधार (How many chances of rain are there in Mumbai?) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील २४ तास महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (What is Maharashtra climate conditions?)
शुक्रवारापासून राज्यात पावसाची संततधार कमी होण्याचा अंदाज आहे. आज राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरींची (IMD issues heavy rain alert for Konkan and Ghats in Maharashtra) शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या हवामान खालच्या पट्ट्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह वीजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता (Yellow alert for Vidarbha and Marathwada with thunderstorms and heavy showers) असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
ऑरेंज अलर्ट : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा
येलो अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा
येलो अलर्ट : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.