मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ८ गाड्यांचा विचित्र अपघात, कैद्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला जबर धडक

Mumbai Pune Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवारी रात्री भातान बोगद्याजवळ एक विचित्र आणि भीषण अपघात घडला. यात पोलिसांच्या पिंजरा गाड्यांसह एकूण ७ ते ८ वाहने एकमेकांवर आदळली. या ताफ्यात बांगलादेशी कैद्यांना घेऊन जाणारी गाडीही होती.
Mumbai Pune Expressway Accident
Scene from Bhatan tunnel accident on Mumbai-Pune Expressway involving 8 vehicles, including a prisoner van.Saam TV News Marathi
Published On

विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ७ ते ८ वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भातान बोगद्यात ८ गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक झाली. अपघातानंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अपघातामध्ये कैद्यांना घेऊन जाणारी पोलिसांची गाडीही होती. या अपघातात १० ते १२ पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पनवेलमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भातान बोगद्यात मंगळवारी रात्री सात ते आठ वाहनांचा विचित्र अपघात घडला. या अपघातात पाच ते सहा पोलिसांच्या पिंजरा गाड्या, एक महामंडळाची बस, एक टेम्पो, एक पोलिस स्कॉर्पिओ आणि जीप यांचा समावेश आहे. पुणे लेनवर घडलेल्या या अपघातात सर्व वाहने एकमेकांवर आदळली. हा ताफा मुंबईहून पुण्याकडे बांगलादेशी कैद्यांना घेऊन जात होता. सुदैवाने, या अपघातात कोणताही कैदी जखमी झाला नाही. मात्र, गाड्या चालवणारे १० ते १२ पोलिस चालक जखमी झाले असून, त्यांना तातडीने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. (Prisoner Transport Van Hit in Multi-Vehicle Crash on Expressway)

Mumbai Pune Expressway Accident
Crime : दुसऱ्या मुलासोबत का बोलते? अकोल्यात भररस्त्यात मुलीला मारहाण, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

अपघातामुळे काही तासांसाठी वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू करून रस्ता मोकळा केला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, वेग आणि नियंत्रण सुटणे यामुळे हा अपघात घडल्याचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक माहिती गोळा केली जात आहे.

Mumbai Pune Expressway Accident
कोल्हापूर हादरलं! शाळेतून सुट्टी मिळवण्यासाठी मित्राचा खून, तोंडात बोळा कोंबून विजेचा शॉक दिला

भिवंडी-कल्याण मार्गावर कंटेनर पलटल्याने चालकाचा मृत्यू

भिवंडी-कल्याण मार्गावर मंगळवारी कंटेनर पलटल्याने झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. मयत चालकाचे नाव राम लखन चव्हाण (वय ४८, शहापूर) असे आहे. तो भिवंडीकडे येत असताना हा अपघात घडला. कंटेनर रिव्हर्स घेताना मागील बाजू उंच असल्याने वाहन कलंडले आणि पलटले. या अपघातामुळे चालकाचा मृत्यू झाला.

अपघाताने भिवंडी-कल्याण मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी शांतीनगर पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.

Mumbai Pune Expressway Accident
कोल्हापूर हादरलं! शाळेतून सुट्टी मिळवण्यासाठी मित्राचा खून, तोंडात बोळा कोंबून विजेचा शॉक दिला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com