
रणजित माजगावकर, कोल्हापूर प्रतिनिधी
Kolhapur Minor boy gives electric shock to friend : कोल्हापूरमधील हातकणंगलेमधील एका हृदयद्रावक घटनेने सर्वांना हादरवून सोडले. सुट्टी मिळण्यासाठी तोंडात बोळा कोंबून विजेचा शॉक देऊन विद्यार्थ्यांचा खून करण्यात आला आहे. बिहारमधील अल्पवयीन मुलाचा त्याच्याच सहकाऱ्याने खून केला. याबाबत हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी संशयित विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून बाल निरीक्षण गृहात केली रवानगी करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या धार्मिक शिक्षण देणारी संस्था बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी, यासाठी बिहार इथल्या अकरा वर्षीय फैजान नजिम या अल्पवयीन विद्यार्थ्यांचा त्याच्याच अल्पवयीन सहकाऱ्याने रविवारी रात्री तोंडात कापडाचा बोळा घालून आणि विजेचा शॉक देऊन खून केल्याची कबुली दिली आहे. संशयित विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालनिरीक्षणगृहात केली आहे.
हातकणंगले तालुक्यातील आळते येथील धार्मिक शिक्षणसंस्थेत (मदरसा) घडलेल्या या धक्कादायक घटनेने सगळ्या कोल्हापूरला हादरवलं. धार्मिक शिक्षण देणाऱ्या या संस्थेत सुमारे 60 हुन अधिक मुले राहतात. तिथे 16 जून च्या पहाटे पाच वाजता अल्पवयीन विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला. हातकणंगले पोलिसांनी संस्थेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले, शिक्षकांची चौकशी केली. सोमवारी रात्री अकरा वाजता गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. याच शैक्षणिक संस्थेतील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांनी झोपलेल्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिक उपकरणांनी शॉक देऊन खून केल्याचे उघड झालेला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सोमवारी मध्यरात्री आळते इथल्या शिक्षण संस्थेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.
खून करणाऱ्या अल्पवयीन मुलाला बोलते करण्यासाठी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांना बोलवण्यात आले. त्यानंतर अल्पवयीन मुलगा बोलता झाला अतिशय क्रूर पद्धतीने त्याने मित्राच्या खून केला. विशेष म्हणजे या घटनेत त्याच्यासह आसपास झोपलेल्या मुलांनाही धोका होता. मात्र याचा कोणताही विचार न करता त्याने विजेचा शॉक देऊन मित्राचा खून केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात आणखी काही मुलांचा सहभाग असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे त्यानुसार आणखी दोन मुलांची चौकशी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.