योगेश काशिद, बीड प्रतिनिधी
Man commits suicide in Beed due to frozen bank deposits : बीडमधील गेवराई शहरात धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या लग्नाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या बापाने खासगी बँकेसमोरच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गेवराईमधील छत्रपती मल्टीस्टेट या खासगी बँकेसमोर ठेवीदाराने गळफास लावून आत्महत्या केली. सुरेश आत्माराम जाधव असे आयुष्याचा दोर कापणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. या धक्कादायक घटनेनंतर गेवराईमध्ये एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बँकेच्या गेटवर गळफास घेऊन बापाने आयुष्याचा दोर कापला. गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील सुरेश आत्माराम जाधव नामक चाळीस वर्षे व्यक्तीने केली आत्महत्या. ११ लाख रुपयांची ठेव बँकेत ठेवल्याची माहिती मिळाली आहे. वारंवार पैसे मागूनही बँकेकडून पैसे दिले जात नसल्याने जाधव यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याची माहिती मिळाली. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
जाधव यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पोलिासांनी मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवला असून पुढील तपास करण्यात येत आहे. रक्कम किती होती आणि याबाबतची इतर संपूर्ण माहिती घेऊन रीतसर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती गेवराई पोलिसांनी दिली आहे. या प्रकारानंतर गेवराईमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगाव मधील ठेवीदार सुरेश आत्माराम जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केली. जाधव यांच्या छत्रपती मल्टीस्टेट बँकेत ११ लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ५ लाख रुपये अडकले होते. मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. मात्र सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना रक्कम परत मिळाली नाही. या मानसिक त्रासामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. रात्री उशिरा कुटुंबासह बँकेत गेलेले जाधव, काही वेळातच बँकेच्या गेटवर मृत अवस्थेत आढळले. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मल्टीस्टेट बँकांची विश्वासार्हता पुन्हा एकदा समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.