Maharashtra Weather : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पाऊस धो धो कोसळणार; कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा

Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात मान्सूनने यंदा वेळेच्या आधीच दमदार हजेरी लावली आहे. राज्यभरात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather forecast
Mumbai and Pune brace for torrential rain as IMD issues a 5-day heavy rainfall alert across 13 districts in Maharashtra. Nagpur continues to report record-breaking heat amid monsoon delays.Saam TV News
Published On

Heavy rain Maharashtra : वेळेच्या आधीच दाखल झालेल्या मॉन्सूनने मंगळवारी महाराष्ट्र व्यापला आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे राज्यात पुढील चार दिवस धो धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. (What is Maharashtra climate condition?)

कोकणात मुसळधार पावसाची शक्यता Where is rainfall in Maharashtra?

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. २० आणि २१ जून रोजीही या भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईत आज तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. १९ जून रोजी ठाणे आणि मुंबईत जोरदार सरी कोसळतील, तर २०-२१ जून रोजी पावसाचा जोर कमी होऊन मध्यम पाऊस पडेल.

Maharashtra Weather forecast
Badlapur : बेकरीतला पाव खाताय, सावधान ! पावात सापडली मेलेली माशी आणि फॉईल पेपर

घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज IMD issues heavy rain alert for Konkan and Ghats in Maharashtra

पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस, तर २० आणि २१ जून रोजी मध्यम पाऊस अपेक्षित आहे. नाशिक घाटमाथ्यावर आज मुसळधार पाऊस पडेल, त्यानंतर मध्यम पाऊस सुरू राहील.

Maharashtra Weather forecast
Jalgaon : धक्कादायक! जळगावात पोलिसावर गुन्हेगाराचा हल्ला, गाडी अंगावर घातली, संदीप पाटील थोडक्यात वाचले

पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल. नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये दोन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. जळगावातही याच काळात वादळी पावसाची शक्यता आहे. अहमदनगर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल.

हवामान खात्याने कोकण आणि घाटमाथ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Maharashtra Weather forecast
Emergency Landing : दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग, १५७ प्रवाशांचा जीव धोक्यात

मान्सूनने महाराष्ट्र व्यापला -

यंदा मान्सूनने विक्रमी वेगाने महाराष्ट्रात प्रवेश केला. २४ मे रोजी केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर दाखल झालेला मान्सून २५ मे रोजी सिंधुदुर्ग आणि २६ मे रोजी मुंबई, पुणे, धाराशीवपर्यंत पोहोचला. २८ मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात प्रगती केली. मात्र, त्यानंतर काही काळ थांबलेला मान्सून पश्चिम बंगाल आणि गुजरातमधील कमी दाब क्षेत्रांमुळे पुन्हा सक्रिय झाला. १७ जून रोजी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे.

Maharashtra Weather forecast
Wedding Turns Tragic : लग्नाच्या आदल्या रात्रीच होणाऱ्या नवऱ्याला संपवलं, नवरी प्रियकरासोबत झाली फरार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com