

Maharashtra weather forecast today : राज्यात सध्या ऑक्टोबर हिटचा जोर कायम असून उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत आहे. पण पुढील हवामानात मोठा बदल होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal cyclone update) तयार झालेल्या तीव्र वादळी प्रणालीमुळे विदर्भासह राज्यभरात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळू शकतो. चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता आहे. (Vidarbha weather update, Marathwada rain forecast,)
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले आहे. त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. हे संभाव्य चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याच्या (Andhra Pradesh cyclone latest news,) दिशेने सरकत आहे. त्यामुळे उद्यापासून (ता. २७) विदर्भ आणि महाराष्ट्राच्या इतर भागांत पावसाला अनुकूल हवामान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यात पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतील.
आज (ता. २६) मात्र राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे आणि आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. सध्या राज्यात उन्हाचा ताप कायम असून, अनेक भागांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले आहे. रविवारी अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर सोलापूर, अकोला, वाशीम, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणी उन्हाचा तडाखा जाणवत आहे. एकीकडे उन्हाचा उकाडा कायम असला, तरी बंगालच्या उपसागरातील या वादळी प्रणालीमुळे मंगळवारपासून (ता. २७) राज्याच्या हवामानात बदल होऊन पावसाची शक्यता निर्माण होणार आहे.
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र रविवारी (ता. २५) अधिक तीव्र झाले आहे. आज (ता. २६) सकाळपर्यंत या भागात चक्रीवादळ घोंघावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे चक्रीवादळ अधिक अतितीव्र होऊन बुधवारी (ता. २८) दुपारपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दुसरीकडे, लक्षद्वीप बेटे आणि लगतच्या अरबी समुद्रात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या प्रणालीमुळे समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, या कमी दाबाच्या पट्ट्यापासून उत्तर तामिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.