राज्यात आता 'ऑक्टोबर हिट'चा तीव्र तडाखा जाणवू लागला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने नागरिकांना घाम फुटत असून प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. तसेच मॉन्सूनने आपल्या ३ महिन्यांच्या मुक्कामानंतर परतीचा प्रवास सुरू केला आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील उर्वरित भागांसह संपूर्ण गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही भागांतून मॉन्सूनने माघार घेतली आहे. सध्या मॉन्सूनच्या परतीची सीमा सुपौल, रांची, रायपूर, ब्रह्मपुरी, परभणी, बारामती आणि हर्णे भागातून जात आहे.
पुढील २ ते ३ दिवसांत मराठवाडा, विदर्भाचा बहुतांश भाग, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, तसेच तेलंगणा आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकच्या काही भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक परिस्थिती निर्माण होत आहे. यावर्षी मॉन्सूनने सरासरीच्या दोन दिवस उशिराने, म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू केला होता. विशेष म्हणजे, २९ जून रोजी मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता.
रत्नागिरी: ३८.० अंश सेल्सिअस (राज्यात उच्चांकी)
मुंबई (कोलाबा): ३७.४ अंश सेल्सिअस
मालेगाव, जळगाव, अमरावती: ३७.२ अंश सेल्सिअस
अकोला: ३७.१ अंश सेल्सिअस
छत्रपती संभाजीनगर, सोलापूर: ३७.0 अंश सेल्सिअस
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील तीन दिवस हीच स्थिती कायम राहील, तर उर्वरित महाराष्ट्रात आकाश कोरडे राहण्यासह उन्हाचा आणि उकाड्याचा चटका कायम राहणार आहे. सकाळपासूनच जाणवणाऱ्या तीव्र उन्हामुळे नागरिकांना उन्हाळ्याची जाणीव होऊ लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.