Maharashtra Weather : २३, २४ आणि २५ सप्टेंबरला राज्यात मुसळधार; पाहा तुमच्या जिल्ह्यात पावसाचा अलर्ट आहे का?

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान विविध जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज आहे.
Rain Alert
Maharashtra Weather UpdateSaam Tv
Published On

Maharashtra IMD Rain Alert : महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून विविध ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, पुण्यापासून ते कोकण आणि विदर्भात, मराठवाड्यापासून उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळाची परिस्थिती झाली आहे. त्यातच या पावसाने थोडासा दिलासा मिळत आहे. पुढील ३ दिवस अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

परतीच्या पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी राज्यात काही ठिकाणी कोसळत आहेत. पण अनेक तालुक्यात अन् गावात पावसाची सरी हजेरी लावत नाहीत. त्यामुळे अनेक भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात बुधवार, गुरूवारी आणि शुक्रवारी काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Rain Alert
१० हजारांचा पगार अडकला; महाराष्ट्राच्या माणसाने २४ कोटींच्या मालाचा केला कोळसा, गुजरातच्या मालकाला शिकवला धडा

२३ सप्टेंबर २०२६ -

नाशिक, नाशिक घाट,अहिल्यानगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली

२४ सप्टेंबर

सातारा, सातारा घाट, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, लातूर, नांदेड, जालना, परभणी,वाशिम, बुलढाणा, अकोला,हिंगोली,अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर,वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली

२५ सप्टेंबर

वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली

Rain Alert
Gold rate today : पितृपक्षापूर्वीच सोनं-चांदी अचानक स्वस्त! २ दिवसांत दरात एवढ्या हजारांची घसरण; पाहा आजचे नवे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com