Gold rate today : पितृपक्षापूर्वीच सोनं-चांदी अचानक स्वस्त! २ दिवसांत दरात एवढ्या हजारांची घसरण; पाहा आजचे नवे दर

Jalgaon gold rate today September : जळगावच्या सुवर्ण बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोने एक हजार रुपयांनी घसरून ₹1.51 लाख प्रति 10 ग्रॅम, तर चांदी ₹3,000 ने घसरून ₹2.35 लाख प्रति किलो झाली आहे.
Gold Rate Today News
Gold Rate Today NewsAI Image
Published On

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार उघडताच दरात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर आज, सलग दुसऱ्या दिवशीही सोने-चांदीचे भाव खाली आले आहेत. त्यामुळे दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक मोठी संधी निर्माण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या घडामोडींचा थेट परिणाम स्थानिक सोने-चांदीच्या बाजारावर होत आहे. गेल्या आठवड्यात दरात काहीशी वाढ झाली होती; मात्र या आठवड्याची सुरुवात घसरणीने झाली आहे. पुढील आठवड्यापासून पितृपक्ष सुरू होत असून, या काळात सहसा दागिन्यांची खरेदी केली जात नाही. त्यामुळे दरवर्षी या दिवसांत सोन्या-चांदीचे दर कमी होताना दिसतात. यंदा मात्र पितृपक्ष सुरू होण्यापूर्वीच, सलग दोन दिवसांपासून दर खाली येऊ लागले आहेत.

चांदी तीन हजार रुपयांनी स्वस्त

सोमवारी बाजार सुरू झाला तेव्हा सोन्याचा भाव १ लाख ५३ हजार रुपये (प्रति १० ग्रॅम, विना जीएसटी) होता. त्यात १ हजार रुपयांची घसरण होऊन सोने १ लाख ५२ हजारांवर आले. आज (२२ सप्टेंबर) पुन्हा १ हजार रुपयांनी घसरण झाल्याने सोन्याचे दर १ लाख ५१ हजार रुपयांवर खाली आले आहेत.

दुसरीकडे, चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तब्बल ३ हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा दर २ लाख ३५ हजार रुपये (प्रतिकिलो, विना जीएसटी) या पातळीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com