Vidhan Parishad Election: मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुका बिनविरोध नाही, मविआ सर्व जागांवर उमेदवार देणार; कुणाच्या वाट्याला किती जागा?

Maha Vikas Aghadi Contest All 17 Seats: आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये विधान परिषद निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडी महायुतीविरोधात सर्व १७ जागा लढवणार आहेत.
Vidhan Parishad Election: मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुका बिनविरोध नाही, मविआ सर्व जागांवर उमेदवार देणार; कुणाच्या वाट्याला किती जागा?
Maha Vikas Aghadi Contest All 17 SeatsSaam TV
Published On
  • विधान परिषद निवडणुकीबाबत मविआचा मोठा निर्णय

  • मविआ सर्व जागांवर उमेदवार देणार

  • काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळणार

  • मविआ महायुतीविरोधात सर्व जागा लढवणार

गिरीष कांबळे, मुंबई

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. त्यापाठोपाठ आता महाविकास आघाडीने देखील या निवडुणकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकीच्या सर्वच्या सर्व १७ जागा लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयामुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही. मविआमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधान परिषद निवडणुकीसंदर्भात आज मुंबईतील टिळक भवन येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर हे नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये विधान परिषद निवडणुकीसह महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व १७ जागा लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Vidhan Parishad Election: मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुका बिनविरोध नाही, मविआ सर्व जागांवर उमेदवार देणार; कुणाच्या वाट्याला किती जागा?
Vidhan Parishad Election: महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच; विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून भाजपची कोंडी

विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व १७ जागा लढवणार आहे. काँग्रेस ७ ते ८, शिवसेना उद्धव ठाकरे गट ५ ते ६ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट ३ ते ४ जागा लढविणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कोण कुठल्या जागांवर लढणार याविषयीचा निर्णय येत्या २ ते ३ दिवसांत घेतला जाणार आहे. २९ तारखेला महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार असून त्यावेळी अंतिम चित्र स्पष्ट होईल. महायुतीतल्या नाराजीचा फायदा उठविण्याचा मविआचा प्रयत्न असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Vidhan Parishad Election: मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुका बिनविरोध नाही, मविआ सर्व जागांवर उमेदवार देणार; कुणाच्या वाट्याला किती जागा?
Raghav Chadha : भाजप प्रवेशानंतर राघव चड्ढा यांना मोदी सरकारनं दिली मोठी जबाबदारी

हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकीच्या सर्व १७ जागा लढवणार आहे. आम्ही सामंजस्याने ही निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. मित्रपक्षांसोबत निवडणूक लढवली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मी कोणताही चुकीचा शब्द उच्चारलेला नाही. कांदाप्रश्नी रास्तारोको करण्यात आला त्यामुळेच सरकारला दिल्लीला जावे लागले.' तर राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी 'विधानपरिषदेच्या संभाव्य सर्व १७ जागांबाबत चर्चा केली.', असल्याची माहिती दिली.

Vidhan Parishad Election: मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुका बिनविरोध नाही, मविआ सर्व जागांवर उमेदवार देणार; कुणाच्या वाट्याला किती जागा?
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; परभणी-हिंगोलीच्या जागेवर भाजपनं सांगितला दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com