Vidhan Parishad Election: महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच; विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून भाजपची कोंडी

Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 7 जागांवर दावा केला आहे.
Vidhan Parishad Election:
Maharashtra Vidhan Parishad election latest political updatesaam tv
Published On
Summary
  • विधान परिषद निवडणुकीआधी महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच निर्माण.

  • शिवसेनेकडून 7 जागांवर ठाम दावा करण्यात आला.

  • भाजप फक्त 3 ते 4 जागा देण्याच्या भूमिकेत.

राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लागलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपावरून ( पेच निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या निवडणुकीत 7 जागांवर आपला ठाम दावा ठोकला आहे. शिवसेनेने भाजपसमोर आधीच्या 5 आणि नव्याने ताकद वाढलेल्या 2 अशा एकूण 7 जागांचा अधिकृत प्रस्ताव ठेवला अशी माहिती समोर येतेय.

Vidhan Parishad Election:
Maharashtra Politics: ठाकरे गटात अंतर्गत वाद उफाळला; 82 पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे, सामूहिक राजीनाम्यांनी राज्यात खळबळ

मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार, भाजपने शिवसेनेच्या या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला नाहीये. भाजपने शिवसेनाला केवळ 3 ते 4 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे शिवसेना 7 जागांवर ठाम असून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्नात आहे. या सर्व राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. "विधानपरिषदेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील.

Vidhan Parishad Election:
Maharashtra Politics: महायुती फुटणार, शिवसेना-भाजप वेगळे होणार? संजय शिरसाट यांच्या विधानाने खळबळ

याआधी धुळे, कोकण या भागांत आमचे 5 आमदार होते. आता पक्षाची ताकद वाढलेली असल्यानं आम्ही 7 जागांची मागणी केली आहे. यावर महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील, असं प्रताप सरनाईक म्हणालेत. मात्र पक्षाने आता कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याचं ठरवलं असल्याचं शिवसेनेतील नेत्यांनी ठरवलंय.

लोकसभा, विधानसभा आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी शिवसेनेने स्वतःची ताकद जास्त असतानाही नेहमीच कमी जागा घेऊन तडजोड केली. त्याची सल आजही पक्षातील अनेक नेते व कार्यकर्त्यांच्या मनात कायम आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा तोच प्रकार सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला काय होता?

विधान परिषदेच्या जागांसाठी महायुतीमध्ये सुरुवातीला जो प्राथमिक फॉर्म्युला ठरत होता, त्यानुसार भाजप 12 जागा, शिवसेना 3 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार असल्याची चर्चा होती. महायुती म्हणून एकत्र लढण्यावर तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले आहे. मात्र काही पारंपरिक जागांची अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com