Vidhanparishad Election: मोठी बातमी! विधान परिषदेसाठी फॉर्म्युला ठरला, भाजपला सर्वाधिक जागा, पाहा शिवसेना-राष्ट्रवादीला किती?

Vidhanparishad Election Mahayuti Formula: विधानपरिषद निवडणुकीच्या १७ जागांसाठी महायुतीचा अखेर फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीमधील भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याचे सांगितले जात आहे.
Vidhanparishad Election: मोठी बातमी! विधान परिषदेसाठी फॉर्म्युला ठरला, भाजपला सर्वाधिक जागा, पाहा शिवसेना-राष्ट्रवादीला किती?
Vidhanparishad Election Mahayuti Formula Saam Tv
Published On
  • विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला

  • महायुतीमधील भाजपला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या

  • शिवसेनेच्या वाट्याला ४ आणि राष्ट्रवादीच्या पदरात २ जागा

भरत मोहोळकर, मुंबई

राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीचा अखेर फॉर्मुला ठरल्याची माहिती समोर आली आहे. सर्वाधिक ११ जागा भाजप लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. तर शिवसेनेच्या वाट्याला ४ आणि राष्ट्रवादीच्या पदरात २ जागा पडल्याचं समजतेय. लवकरच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल.

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा दिल्लीत सुटला. एकनाथ शिंदे यांची दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते उपस्थित होते. या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्मुला ठरल्याची माहिती मिळाली. परभणी, कोकण, ठाण्याची जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा अद्याप सुटला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Vidhanparishad Election: मोठी बातमी! विधान परिषदेसाठी फॉर्म्युला ठरला, भाजपला सर्वाधिक जागा, पाहा शिवसेना-राष्ट्रवादीला किती?
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; परभणी-हिंगोलीच्या जागेवर भाजपनं सांगितला दावा

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड आणि पुण्याची जागा सुटल्याची माहिती समोर आली आहे. रायगडमधून सुनील तटकरे यांच्या मुलाचे नाव राष्ट्रवादीकडून आघाडीवर आहे. तर पुण्यात ४ ते ५ जण इच्छूक असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाला तिकीट मिळणार, याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा खिळल्या आहेत. पुढच्या २४ तासांमध्ये जागा वाटपाचा अधिकृत फॉर्म्युला जाहीर होणार आहे. येत्या २ ते ३ दिवसांमध्ये उमेदवारांची नावं देखील जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

Vidhanparishad Election: मोठी बातमी! विधान परिषदेसाठी फॉर्म्युला ठरला, भाजपला सर्वाधिक जागा, पाहा शिवसेना-राष्ट्रवादीला किती?
Vidhan Parishad Election: महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच; विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून भाजपची कोंडी

राज्यातील विधानपरिषदेच्या १७ जागांसाठीच्या निवडणुकीसाठी २५ मे रोजी अधिसूचना जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर मतमोजणी २२ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ जून आहे. अनेक राजकीय पक्षांनी अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे. अर्जाची छाननी दुसऱ्या दिवशी म्हणजे २ जूनला होणार आहे. तर अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख ४ जून आहे.

Vidhanparishad Election: मोठी बातमी! विधान परिषदेसाठी फॉर्म्युला ठरला, भाजपला सर्वाधिक जागा, पाहा शिवसेना-राष्ट्रवादीला किती?
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार, मोदी-ममतांची प्रतिष्ठा पणाला

कुणाला कोणत्या जागा सुटणार?

भाजप - ११ जागा

सोलापूर

अहिल्यानगर

जळगाव

सांगली-सातारा

नांदेड

भंडारा- गोंदिया

नाशिक

वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली

अमरावती

नागपूर

राष्ट्रवादी काँग्रेस - २ जागा

पुणे

कोकण

शिवसेना - ४ जागा

ठाणे

परभणी- हिंगोली

यवतमाळ- वाशिम

छत्रपती संभाजीनगर- जालना

Vidhanparishad Election: मोठी बातमी! विधान परिषदेसाठी फॉर्म्युला ठरला, भाजपला सर्वाधिक जागा, पाहा शिवसेना-राष्ट्रवादीला किती?
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; परभणी-हिंगोलीच्या जागेवर भाजपनं सांगितला दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com