मोठी बातमी! एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत दाखल, अमित शाहांची तातडीने भेटणार, राज्यात नेमकं काय सुरू?

Eknath Shinde Delhi visit latest news : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले असून अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. विधान परिषद जागावाटप आणि ऑपरेशन टायगरवर महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Maharashtra Legislative Council Elections : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. विधानपरिषदेच्या जागांचा तिढा सोडवण्यासाठी ते दिल्लीला गेल्याची चर्चा आहे. शिंदसेनेने विधानपरिषदेसाठी 6 जागांची मागणी केली असून भाजपनं मात्र ४ जागा शिंदेसेनेला देण्याची तयारी दर्शवलीय. त्यामुळे मुंबईत जागावाटपाचा तोडगा न निघाल्यानं शिंदे आता दिल्लीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत ऑपरेशन टायगरबाबतही महत्त्वाची चर्चा होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. राज्यात विधान परिषदेच्या १६ जागांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्र भाजपकडून फक्त ३ जागा देण्यात आल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला ७ जागा हव्यात, त्यासाठी शिंदे दिल्लीला रवाना झाल्याचे समजतेय. त्याशिवाय ऑपरेशन टायगरवरही चर्चा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com