Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Narendra Jadhav Black and White Interview : सध्या स्थिती काय आहे ते लक्षात घेऊन विद्यार्थ्यांवर अतिरिक्त दडपण न आणता कशाप्रकारे फॉर्मुला करता येईल, याचा विचार त्रिभाषा सूत्र समिती करणार आहे', असं त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी म्हटलं आहे.
Narendra Jadhav Black and White Interview
Narendra Jadhav Black and White Interview Saam Tv News
Published On

मुंबई : महाराष्ट्रात सध्या हिंदी विरुद्ध मराठी, मराठी विरुद्ध हिंदी आणि परप्रांतीय विरुद्ध महाराष्ट्रीयन, असा वाद उभाळून आलेला आहे. तो काही प्रमाणात राजकीय दाखवला जात असला किंवा दिसत असला तरी त्याला सामाजिक कंगोरी आहे. मुळात हा वाद कुठून सुरु झाला, तर पहिलीपासून हिंदीची सक्ती असावी का? या मुळ मुद्दापासून, आणि त्यातून महाराष्ट्रातलं राजकारण उफाळून आलं. सर्वसामान्यांना काय वाटतं? त्याची चाचपणी सुरुच आहे. त्यासंदर्भात सरकारही विचार करत आहे. पण सरकारने आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं, ते म्हणजे या पूर्ण वादावर अभ्यास करण्यासाठी म्हणून एका समितीचं गठण करण्याची घोषणा केली. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना होणार आहे आणि लवकरच त्याची घोषणा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द नरेंद्र जाधव यांनी साम टिव्हीच्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या विशेष कार्यक्रमात आपलं मत, प्रतिक्रिया, त्यात काम कसं होणार आहे, सदस्य किती असणार आहेत? या सर्व मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

नरेंद्र जाधव म्हणाले की, 'मी राजकारणी नाही तज्ञ आहे, आणि वेगवेगळ्या विषयांचा तज्ञ आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक माझा उपयोग करून घेतात आणि यात गैर काहीच नाही. भाषा अडसर येऊ शकतो. पण एकदा तुम्ही तो अडसर दूर केला की, नंतर सगळे आभाळ तुमच्यासाठी मोकळं आहे. तुम्हाला सांगतो की मी मराठी माध्यमात शिकून सुद्धा नंतर मी १० वर्ष अमेरिकेला काढले. सध्या स्थिती काय आहे ते लक्षात घेऊन विद्यार्थ्यांवर अतिरिक्त दडपण न आणता कशाप्रकारे फॉर्मुला करता येईल, याचा विचार त्रिभाषा सूत्र समिती करणार आहे', असं त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी म्हटलं आहे.

Narendra Jadhav Black and White Interview
पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्या प्रक्रियेमध्येच त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी सध्या असलेल्या सरकारने पुढाकार घेतला. त्यांनी तो जीआर जारी केला. मी स्वतः सर्व राजकीय नेत्यांना मग त्यात राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील आणि इतर जे आहेत त्या सगळ्यांचे वैयक्तिक भेट घेऊन त्यांची भूमिका समजून घेणार आहे. त्याचबरोबर सगळ्या भागधारकांची चर्चा करणार आहे. पूर्ण शिक्षण क्षेत्राचा आमूलाग्र परिवर्तन केल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. AI मुळे IY क्षेत्रामध्ये ज्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यातील हजारो तंत्रज्ञ पुढच्या दोन वर्षात बेकार होणार आहेत', असंही नरेंद्र जाधव यांनी यावेळी नमूद केलं आहे.

Narendra Jadhav Black and White Interview
Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com