महाराष्ट्रासाठी रविवार ठरला घातपाताचा वार; 10 जणांचा मृत्यू, पुणे-सोलापूरवर शोककळा

Sunday of Tragedy: महाराष्ट्रात उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पुणे, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांत बुडून मृत्यूच्या घटना वाढल्या असून रविवारी 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रशासन आणि नागरिकांसाठी हा इशारा मानला जात आहे.
Tragic scenes emerge as multiple drowning incidents claim 10 lives across Maharashtra amid rising temperatures.
Tragic scenes emerge as multiple drowning incidents claim 10 lives across Maharashtra amid rising temperatures.saam tv
Published On

राज्यात उष्णतेचा पारा चढत असताना नदी, कालवे आणि शेततळ्यांमध्ये उतरून थंडावा मिळवण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी मृत्यूच्या घटना वाढताना दिसत आहेत. सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात अशाच तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुंद्रूप गावाजवळील नाईक नगर तांड्यावर रविवारी दुपारी दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. समर्थ मोहन चव्हाण (वय 13) आणि ओंकार रमेश चव्हाण (वय 12) अशी मृत मुलांची नावे आहेत.

Tragic scenes emerge as multiple drowning incidents claim 10 lives across Maharashtra amid rising temperatures.
शिंदे, शेलार, चाकणकर, पाटील खरातचे वऱ्हाडी, भोंदूच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका समोर|VIDEO

जिल्ह्यात तापमान 44 अंशांवर पोहोचल्याने उष्णतेचा त्रास होत असताना दोघेही मुळे शेततळ्यात पोहोचण्यासाठी गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला असता दोघेही पाण्यावर तरंगताना आढळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तसेच मोहोळ तालुक्यातील ढोकबाबुळगाव येथे उजनीच्या डाव्या कालव्यात दोन परप्रांतीय कारागीर वाहून जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. राजस्थान येथील श्रीकांत चोपडा आणि रविकांत चोपडा अशी मृतांची नावे आहेत.

Tragic scenes emerge as multiple drowning incidents claim 10 lives across Maharashtra amid rising temperatures.
शिंदे, शेलार, चाकणकर, पाटील खरातचे वऱ्हाडी, भोंदूच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका समोर|VIDEO

दोघेही कालवा पाहण्यासाठी गेले असताना रविकांत पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी गेले असताना रविकांतने श्रीकांतचा पाय धरल्याने दोघेही पाण्यात बुडाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. रविवारी दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले. या घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Tragic scenes emerge as multiple drowning incidents claim 10 lives across Maharashtra amid rising temperatures.
Maharasahtra Heatwave: विदर्भात सूर्य कोपला, प्रत्येक जिल्ह्याचा पारा 42 पार, नागपुरात शाळांना सुट्टी

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मुळशी तालुक्यातील मुलखेड येथे मुळा नदी पत्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. पंकज हा मित्रांसोबत नदीकाठी पार्टीसोबत गेला होता. दरम्यान तो पाण्यात उतरला असता अचानक बुडू लागला आणि काही वेळातच बेपत्ता झाला. माहिती मिळताच पौड पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापक पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते, सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तर मावळच्या शिरोटा डॅममध्ये पर्यटनासाठी आलेल्या २ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे दोघे पुण्यातील होते. तर दुसऱ्या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. मुळशी तालुक्यातील मुलखेड येथे मुळा नदीपात्राशेजारी मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tragic scenes emerge as multiple drowning incidents claim 10 lives across Maharashtra amid rising temperatures.
निदा खानला आश्रय देणं भोवलं; एमआयएमच्या नेत्याच्या घर आणि ऑफिसवर चालणार बुलडोझर|VIDEO

तसेच लातूर शहरातील बोधे नगर परिसरात एक हृदय द्रावक घटना समोर आली आहे, सायंकाळच्या वेळी बाहेर खेळणाऱ्या दोन चिमुरड्यांचा चेंडू शेजारील एका शेवाळलेल्या खड्ड्यात पडला, चेंडू काढण्यासाठी गेलेल्या दिव्या उबाळे वय 6 वर्ष, आणि कार्तिक कांबळे वय 7 वर्ष या दोन चिमुरड्याचा खड्ड्यात बुडून मृत्यू झालाय, दरम्यान ज्या खड्ड्यात या दोन मुलांचा बळी गेला ती जागा मालकाने टँकर व्यावसायिकाला भाडेतत्त्वावर दिला होता संबंधित टँकर चालक व्यावसायिकाने प्लॉटमध्ये खड्डा खोदून त्यात ताडपत्री आतरली होती, 20फूट रुंद 20लांब आणि 15 फूट खोलीचा खड्डा खोदला होता, तर या खड्ड्यात बोरचे पाणी साठवून टँकरद्वारे विक्री करण्यात येत होती ,मात्र खड्ड्याच्या बाजूनी कुठलीही सुरक्षेची जबाबदारी संबंधित टँकर व्यवसाय करणे घेतली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातामुळे रविवार अपघात ठरला असून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com