Kalyan : शाळेच्या ताब्यासाठी दोन संस्थांमध्ये तुफान राडा, व्यवस्थापक व शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला, लाकडी दांडक्याने मारहाण

Kalyan Latest News : शाळेच्या ग्राउंडमध्ये लाकडी दांडक्याने व्यवस्थापकाला मारहाण झाले. शाळेच्या प्रांगणात गोंधळ, शिवीगाळ, मारहाण,कपडे फाडणे व दगडफेकीची घटना घडली आहे. कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरातील शांती हिंदी विद्यालयातील घटना
Kalyan Latest News
Kalyan Latest News
Published On

अभिजीत देशमुख, ठाणे प्रतिनिधी

Kalyan school fight : कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात असलेल्या शांती हिंदी विद्यालयाच्या ताब्यासाठी दोन संस्थांमध्ये तुफान राडा झाला. शाळेच्या मैदानातच व्यवस्थापकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, पोलिसांनी जखमी व्यवस्थापकाला फरपटत नेतानाचाही व्हिडिओ समोर आला आहे.

५ एप्रिल रोजी सकाळी कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात असलेल्या शांती हिंदी विद्यालयाचे संस्थेचे स्वयंसेवक व केअरटेकर म्हणून काम करत असलेल्या विवेक श्रीकांत पांडे काम करत होते. या वेळी शाळेच्या आधीच्या संस्थेत असलेले विनोद पांडे, गगन जैस्वार, नीतू पांडे, श्वेता पांडे, सुष्मा पांडे आपल्या इतर साथीदारा शाळेच्या ग्राउंडमध्ये विवेक पांडेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्याच्या तोंडावर काळं फासून एका खोलीत डांबून जीवघेणा हल्ला केला.

Kalyan Latest News
Kolhapur : चांगभलं देवा ज्योतिबा! कोल्हापूर दख्खनच्या राजाची आज चैत्र यात्रा; लाखो भाविक दाखल

या हल्ल्यात ते गंभीर जख्मी झाले असून आधीच्या संस्थेचे नोकरीला लागलेल्या बनावट दस्तऐवज असल्याचा पुरावे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली त्यामुळे माझ्यावर जीव गेला हल्ला झाल्याचा आरोप करत त्यांनी चोरी जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा महात्मा फुले पोलिस ठाण्यात दाखल केला आहे . तर दुसरीकडे, या घटनेबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका सुमित्रा तिवारी यांनीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या जबाबानुसार – विवेक पांडे व इतरांनी त्यांच्यावरही हल्ला केला. त्यांचे कपडे फाडून लज्जास्पद कृत्य केले आणि ७ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. त्यांच्यासह अनेक महिलांनी शाळेच्या आवारात शिवीगाळ, आरडाओरडा, आणि दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Kalyan Latest News
Crime : विवाहितेशी संबंध, ५ जणांकडून दोघांची हत्या, जंगलात रॉडने हल्ला करत घेतला जीव

याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी दोन्ही संस्थेच्या 15 ते 20 जणांना त्याचा प्रयत्न जबरी चोरी सह अनेक कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करत तपास सुरू केला आहे मात्र या घटनेने कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली असून या घटनेत मारहाणीचा सह मारहाणी नंतर पोलीसां कडून जखमी व्यक्तीला फरपटत नेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com