निदा खानला आश्रय देणं भोवलं; एमआयएमच्या नेत्याच्या घर आणि ऑफिसवर चालणार बुलडोझर|VIDEO

Bulldozer Action On AIMIM Corporator House In Sambhajinagar: निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल अडचणीत आले असून संभाजीनगर महानगरपालिकेने त्यांच्या घर आणि कार्यालयावर अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावली आहे.

एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलच्या घर आणि ऑफिसवर बुलडोझर चालणार आहे. संभाजीनगर पालिकेने हे बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस मतीन पटेलच्या घर, ऑफिसवर चिटकवलीय. नाशिकच्या टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेलवर गुन्हा दाखल झालाय. मतीन पटेल याचं नारेगाव मधील ऑफिस, ज्या घरात निदा खानला आश्रय होता ते घर आणि त्याचं स्वतःचं राहत घर या तिन्ही ठिकाणी नोटीस चिटकवण्यात आली आहे. मागच्या एक महिन्यांपासून निदा खान ही पोलिसांना गुंगारा देत फिरत होती. मुंब्रा, भिवंडी अशा या शहरांमध्ये ती वास्तव्यास होती असे देखील बोलले जात होते. अखेर गुरुवारी ती छत्रपती संभाजीनगर पोलिसांना सापडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com