Maharashtra Weather : पुढील ४ दिवस राज्यात मुसळधार ! ३६ जिल्ह्यांचा हवामान अंदाज समोर; विदर्भात ऑरेंज तर कोकणात यलो अलर्ट

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर कोकण, घाटमाथा आणि इतर अनेक भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Dark monsoon clouds over Maharashtra during IMD rain alert.
Heavy rain forecast prompts IMD alerts across Maharashtra.Saam TV Marathi
Published On

Maharashtra weather forecast next four days : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज मुंबई वेधशाळेनं वर्तवला आहे. जुलै अखेर म्हणजेच पुढील चार दिवस विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई वेधशाळेने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विदर्भाला ऑरेंज अलर्ट; २९ आणि ३० जुलैला जोरदार पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ३० जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट कायम असेल. या काळात येथे विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Dark monsoon clouds over Maharashtra during IMD rain alert.
BJP Office : राजकारण तापले! थेट भाजपच्या ऑफिसवर 'पेट्रोल बॉम्ब'ने हल्ला; पोलिसांकडून शहरात नाकाबंदी

कोकण अन् घाटमाथ्यावर पावसाची संततधार

२८ ते ३१ जुलै या संपूर्ण चार दिवसांच्या कालावधीत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पर्यटकांनी आणि स्थानिक नागरिकांनी घाटमाथ्यावरून प्रवास करताना विशेष खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

Dark monsoon clouds over Maharashtra during IMD rain alert.
पेपरफुटी आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज; सर्वोच्च न्यायालय भडकले, सीजेआय सूर्यकांत यांचे अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य

२८ जुलै २०२६

यलो अलर्ट (Yellow Alert): रायगड, जळगाव, पुणे घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.

२९ जुलै २०२६

ऑरेंज अलर्ट (Orange Alert ): गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.

यलो अलर्ट (Yellow Alert) : नाशिक, नाशिक घाट, जळगाव, छ. संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सातारा घाट, रायगड, पुणे घाट आणि सिंधुदुर्ग.

३० जुलै २०२६

ऑरेंज अलर्ट (Orange Alert): चंद्रपूर.

यलो अलर्ट (Yellow Alert): रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली.

३१ जुलै २०२६

यलो अलर्ट (Yellow Alert): रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, वर्धा आणि यवतमाळ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com