Rain Alert : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! कुठे कोणता अलर्ट? हवामानाचा अंदाज एका क्लिकवर

Maharashtra district wise rain alert today : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज आणि अलर्ट एका क्लिकवर जाणून घ्या.
Rain Alert: राज्यात आजही अतिवृष्टी, वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज; पुढचे २४ तास महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Maharashtra RainSaam tv
Published On

Maharashtra Rain Alert, IMD Weather Update : सध्या असलेल्या ढगाळ वातावरणात तुमच्या भागातही रिमझिम सुरू आहे का? कारण कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर कायम राहून तापमानात चढ-उतार होत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Rain Alert: राज्यात आजही अतिवृष्टी, वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज; पुढचे २४ तास महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याची धुरा कोण सांभाळणार? बड्या नेत्याने थेट नाव सांगितलं

आज कुठे कोणता अलर्ट ?

ऑरेंज अलर्ट: रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा येथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

येलो अलर्ट: मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, चंद्रपूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात इतर ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.

Rain Alert: राज्यात आजही अतिवृष्टी, वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज; पुढचे २४ तास महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Shiv Sena : बड्या नेत्याचा अपघाती मृत्यू, शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखावर आरोप, महाराष्ट्रात खळबळ

विदर्भाला पावसाचा 'येलो अलर्ट'

तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे नागपुरात उकाडा प्रचंड वाढला आहे. शहरातील कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून ते सरासरीपेक्षा २.६ अंशांनी अधिक नोंदवले गेले आहे. वातावरणातील आर्द्रता ९० टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत घसरल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असून नागरिक घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा उकाड्याचा त्रास आणखी एक दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर वातावरणात बदल होऊन नागपूरसह संपूर्ण विदर्भात २८ आणि २९ जुलै रोजी पावसाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तवण्यात आल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com