Maharashtra Politics: आम्हाला बैठकीचे निमंत्रण का नाही? रमेश चेन्नीथाला आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर 'वंचित'चा सवाल!

Vanchit Bahujan Aaghadi: कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांची शिवसेना ठाकरेगटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वर्षा गायकवाड, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते.
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar NewsSaam Tv
Published On

Maharashtra Politics:

कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांची शिवसेना ठाकरेगटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वर्षा गायकवाड, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच वंचित आघाडीचे नेते उपस्थित नव्हते. यावरुन आता वंचित बहुजन आघाडीने सवाल उपस्थित केला आहे.

देशात आणि महाराष्ट्रात भाजप (BJP) आणि आरएसएसला (RSS) पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने लवचिक भूमिका घेऊन महाविकास आघाडीसोबत समझोता केलेला आहे. सत्ता परिवर्तनासाठी चर्चा पुढे जात असताना समन्वयाने महत्त्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांना या बैठकीपासून 'वंचित' का ठेवलं ? असा सवाल वंचितने उपस्थित केला आहे. दरम्यान, काँग्रेसने २४ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी २३ जागांची मागणी केल्याची बातमी पसरली असून, ही बाब खरी आहे का? अशीही विचारणा वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Prakash Ambedkar News
Maharashtra Politics: ते १६ वर्ष पंतप्रधान होते, तुम्ही तर..., उद्धव ठाकरेंनी कोणत्या पंतप्रधानांवरून भाजपला सुनावलं? जाणून घ्या

दरम्यान, या बैठकीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सकाळी पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केला होता. राज्यातील वाढती गुन्हेगारी, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच या सर्व मुद्द्यांवरुन महाविकास आघाडीकडून कशाप्रकारे सरकारला घेरण्यात येईल, याची रणनितीही ठरवण्यात आल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. (Latest Marathi News)

Prakash Ambedkar News
Kalyan News : मुख्यमंत्री येणार असल्याने दिव्यांगांच्या टपऱ्या हटविल्या; कारवाई विरोधात दिव्यांगांचे आयुक्तांच्या घराबाहेर ठिय्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com