Uddhav Thackeray : अबकी बार भाजप हद्दपार; उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

Uddhav Thackeray Latest News : 'आपण शतक मारणार आहोत. यामुळे काहींना घाम फुटला आहे. ते ४०० पारचा नारा देत आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam tv
Published On

सचिन गाड, मुंबई

Uddhav Thackeray News:

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ४०० पार जागा जिंकणार असल्याचा नारा दिला आहे. भाजपच्या नाऱ्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे. 'आपण शतक मारणार आहोत. यामुळे काहींना घाम फुटला आहे. ते ४०० पारचा नारा देत आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरेंनी मुंबईतील चेंबूर येथील शाखेला भेट दिली. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शाखांना प्रत्यक्ष भेट देत स्थानिक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray
Madh Versova dream Project: मुंबईकरांसाठी खूशखबर! अवघ्या १० मिनिटांत गाठता येणार २२ किमी अंतर, या उड्डाणपुलाला मिळाली CRZ ची परवानगी

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

१. सत्ताधारी लोक अजूनही लोकांना प्रलोभने दाखवत आहेत. यांचे बाळासाहेबांचे विचार आता समोर येत आहेत. दिल्लीश्वराची लाचारी करण्यासाठी त्यांना निधी मिळाला आहे. लवाद म्हणून जे बसले होते, त्यांनाही निधी मागितल्यानंतर एक दिवसात मंजूर झाला.

२. अभिषेक घोसळकरांची हत्या झाली. भाजपच्या आमदाराने भर पोलीस ठाण्यात गोळीबार केला. देवेंद्र फडणवीस यांना कळत नाहीये की, त्यांच्याबरोबर कोण आहे. त्या मॉरिसचा फोटो भगतसिंह कोश्यारी यांच्याबरोबर आहे.

३. भाजपच्या आमदारांवर गोळीबार करायची वेळ येते. मग त्यांचा राजीनामा मागायचा की नाही?

Uddhav Thackeray
Baba Siddique: सोडून जाताना दुःख होतं, पण..; अजित पवार गटात प्रवेश करताच सिद्दीकींनी सांगितलं काँग्रेस सोडण्याचं खरं कारण

४. धारावतील संपूर्ण मिठागर उद्योगपती अदानीच्या घशात घातलं. हे सर्व अदानी यांच्यासाठी सुरु आहे.

५. कोस्टल रोड पूर्ण नाही, पण निवडणुकीनंतर तुम्ही नसणार यामुळे अर्धवट कामांचा घाट घातला जात आहे.

६. पंतप्रधान मोदी यांच्या त्या प्रकल्पाशी काही संबंध नाही. तो मुंबईकरांच्या पैशांतून बांधला गेला आहे. तुम्ही भूमीपूजन केलेल्या कामाचं काय झालं? तुम्ही नारळ फोडले, त्याचा खोबरे, मलिदा कोण खातंय? सगळं गुजरातला गेलं. विश्वचषकाचा अंतिम सामनाही गुजरातला नेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com