Baba Siddique: सोडून जाताना दुःख होतं, पण..; अजित पवार गटात प्रवेश करताच सिद्दीकींनी सांगितलं काँग्रेस सोडण्याचं खरं कारण

Baba Siddique Join NCP: क्ष सोडून जाताना दुःख होतं, पण पर्याय नसल्याची खंत आज बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश करताना बोलून दाखवली. अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
Baba Siddique
Baba SiddiqueSaam Digital
Published On

Baba Siddique

काँग्रेस पक्ष सोडू नये असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं होतं. पण आपलं जमत नाही तिथे कशाला थांबायचं. मतभेद झाले तिथंच ठरवलं होतं की पक्षातून निघायचं. पक्ष सोडून जाताना दुःख होतं, पण पर्याय नसल्याची खंत आज बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश करताना बोलून दाखवली. अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

बाबा सिद्दिकी यांनी याच आठवड्यात काँग्रेसला रामराम ठोकत मोठा धक्का दिला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. १० फेब्रुवारी रोजी म्हणजे आज त्यांचा प्रवेश निश्चित मानला जात होता. अपेक्षेप्रमाणे आज त्यांनी उजित पवार गटाच्या नेत्यांच्या उपस्थित प्रवेश केला.

बाबा सिद्धिकी यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रिफ, आदिती तटकरे यांच्यासह अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमस्थळी अजित पवार यांचं आगमन होताचं जेसीबीने फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत करण्यात आलं.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिलिंद देवरा यांनी काँग्रेससोबतच्या राजकीय (Maharashtra Politics) प्रवासाला 'विराम' दिल्यानंतर मुंबईतील आणखी एक बडा नेता काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा होती. बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यावेळी बाबा सिद्दीकी यांनी या वृत्ताचं खंडन केलं होतं.

Baba Siddique
Nashik Youth Congress: राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली? नाशिकमध्ये फडणवीसांना दाखवले काळे झेंडे

मी आजही काँग्रेससोबत आहे आणि भविष्याचं काही सांगता येणार नाही, असं ठणकावून सांगितलं होतं. मात्र, त्याच्या काही दिवसांनंतरच बाबा सिद्दीकी यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असं जाहीर केलं.

मी तरूणपणातच काँग्रेसशी जोडलो गेलो होतो. मागील ४८ वर्षांचा प्रवास माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. आज तात्काळ प्रभावाने मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खूप काही बोलायचं होतं, पण काही गोष्टी न बोललेल्याच उत्तम असतात. माझ्या प्रवासात ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचे मी आभार मानतो, अशी पोस्ट बाबा सिद्दीकी यांनी एक्सवर लिहिलं होतं.

Baba Siddique
Jalyukt Shivar Mission: एल नीनोवर कशी केली मात ? जलयुक्त शिवार अभियानावर होणाऱ्या आरोपांवरून देवेंद्र फडणवीस म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com