Nashik Youth Congress: राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली? नाशिकमध्ये फडणवीसांना दाखवले काळे झेंडे

Nashik Youth Congress News: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले आहेत.
Nashik Youth Congress
Nashik Youth CongressSaam Digital
Published On

Nashik Youth Congress

नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस यांना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न केला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फडणवीसांना दाखवले काळे झेंडे दाखवले आहेत. दरम्यान पोलिसांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. 34 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या. या स्पर्धांचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

या आठवड्यात राज्यात मोठ्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. मुंबई परिसरात दोन मोठ्या गोळीबाराच्या घटना झाल्या. तर काल पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमासाठी जाणाऱ्या पत्रकार आणि समाजसेवकांच्या कारवर हल्ला झाला आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आलं असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nashik Youth Congress
India Famous CM : देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी आली समोर, एकनाथ शिंदे कोणत्या क्रमाकांवर?

आव्हानातून संधी शोधली

एल नीनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी पडला. त्यामुळे संपू्र्ण राज्याला पाणी कसं द्यायचं हा प्रश्न सरकार समोर होता. मात्र सरकारने या आव्हानातून संधी शोधली आणि जलयुक्त शिवार अभियानातून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. आज संपूर्ण राज्यातून जलरथ जाणार आहे. याची सुरुवात श्री रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीतून होत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत जलरथ अभियानाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं, यावेळी ते बोलत होते.

Nashik Youth Congress
Baba Siddique: सोडून जाताना दुःख होतं, पण..; अजित पवार गटात प्रवेश करताच सिद्दीकींनी सांगितलं काँग्रेस सोडण्याचं खरं कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com