Madh Versova dream Project: मुंबईकरांसाठी खूशखबर! अवघ्या १० मिनिटांत गाठता येणार २२ किमी अंतर, या उड्डाणपुलाला मिळाली CRZ ची परवानगी

Mumbai Traffic News:अंधेरी पश्चिम येथील मढ-वर्सोवा प्रकल्पाला ‘सीआरझेड’ची परवानगी मिळाल्याने १० मिनिटांत हे अंतर कापता येणार आहे. २२ किमीचे अंतर स्वामी विवेकानंद मार्गाने कापण्यासाठी ४५ ते ९० मिनिटे इतका वेळ लागतो.
Madh Versova dream Project
Madh Versova dream ProjectSaam Digital
Published On

Madh Versova dream Project

अंधेरी पश्चिम येथील मढ-वर्सोवा प्रकल्पाला ‘सीआरझेड’ची परवानगी मिळाल्याने या पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे. मढ बेट-वर्सोवादरम्यान २२ किमीचे अंतर स्वामी विवेकानंद मार्गाने कापण्यासाठी ४५ ते ९० मिनिटे इतका वेळ लागतो. मात्र प्रस्तावित पूल सेवेत आल्यावर अवघ्या १० मिनिटांत हे अंतर कापता येणार आहे. या पुलाच्या कामासाठी मुंबई महापालिकेकडून ७०० कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

अंधेरीत येथील गोखले पूल कोसळून दोन जणांचा तर १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या दुर्घटनानंतर महापालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट केले. या अहवालातील शिफारशीनुसार आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नव्याने, तर नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबईतील उड्डाणपुलांचे जाळे वाढवले जात आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात नवीन पुलांची उभारणी करण्यात येत आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Madh Versova dream Project
BMC Teacher Vacancy: शिक्षकांसाठी मोठी बातमी! महापालिकेच्या शाळांमध्ये बंपर भरती, किती आहेत जागा? कोणत्या शांळामध्ये संधी?

या पुलासह पी/उत्तर मालाडमधील धारिवली गाव येथील मार्वे रोडवरील पूल आणि के/पश्चिम आणि पी-दक्षिण गोरेगावच्या सीमेवर वाहनांसाठी भगतसिंगनगर गोरेगाव खाडीजवळ देखील पूल बांधण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले. मढ ते वर्सोवा थेट सार्वजनिक वाहतुकीचा एकमेव मार्ग म्हणजे फेरीसेवा आहे. मात्र ही सेवा पावसाळ्यात चार महिने बंद असते. त्यामुळे मढ किंवा वर्सोवा येथे जाण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग किंवा स्वामी विवेकानंद मार्ग असे दोन अन्य वाहतुकीचे पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. काही वर्षांपासून नवीन पुलाची मागणी केली जात होती. या पुलांसाठी महत्त्वपूर्ण असणारी सीआरझेड परवानगी मिळाल्यामुळे हे पूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्थानिकांना दिलासा

मुंबईत बांधण्यात येणारे नवीन पूल वाहतूक कोंडी फोडण्यासाठी व वेगवान प्रवासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. मढ-वर्सोवा या नव्या पुलामुळे दोन्ही भागांतील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, मच्छीमार बांधव, व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.

Madh Versova dream Project
BMC Vs State Govt.: कोविड खर्च, मालमत्ता अन् बरंच काही; राज्य शासनाकडे BMC ची १५,००० कोटींची थकबाकी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com