मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची मोठी भरती होणार आहे. पालिका शिक्षण विभागाने याबाबतची जाहिरात दिली असून मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा चार माध्यमांसाठी तब्बल १३४२ पदे भरण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या ‘पवित्र’ पोर्टलद्वारे या महिन्याच्या अखेरपर्यंतही ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, ऊर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा आठ भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१२९ शाळांमध्ये मिळून सध्या तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोना साथीनंतर पालिका शाळांतील पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. सीबीएसईसह अन्य बोर्डांच्या शाळा, शैक्षणिक वस्तू वाटप यामुळेही विद्यार्थी संख्या वाढली आहे. सध्या शाळांतील पटसंख्या वाढली असताना शिक्षकांची पदे मात्र मागील काही वर्षापासून रिक्त आहेत; परंतु गेल्या काही वर्षांत शिक्षकांची भरती झालेली नाही. प्राथमिक शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने चार माध्यमांसाठी पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शिक्षण विभागाकडून यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. त्यानुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पदभरतीत पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांनाच संधी मिळणार आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त असल्या तरी सध्या तासिका तत्वावर काही सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा घेण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांची कमतरता भरून काढली आहे; परंतु या भरतीमुळे कायमस्वरूपी शिक्षक मिळतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
पात्र उमेदवारांना १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर छाननी करून मग त्यांची यादी जाहीर केली जाईल. पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत कागदपत्रांची पडताळणी करून मग त्यांना नियुक्तिपत्र दिले जाईल. फेब्रुवारी अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
इंग्रजी - ६९८
हिंदी - २३९
मराठी - २१६
ऊर्दू - १८९
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.